शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मणदादा अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:54 IST

भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता भूवैकूंठाच्या भूमीत हजारोच्या गुरुदेवभक्तांच्या उपस्थितीत अत्यंसस्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता भूवैकूंठाच्या भूमीत हजारोच्या गुरुदेवभक्तांच्या उपस्थितीत अत्यंसस्कार करण्यात आला.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील आत्मानुसंधान भू-वैकूंठ अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचे रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर हजारो गुरुदेवभक्ताच्या साक्षीने सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांच्या संतकुटीमधून त्यांचे पार्थिव ग्रामगिता व्यासपिठावर आणण्यात आले. त्यानंतर तेथे त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. हजारो गुरुदेव भक्तासमवेत दादांचे पार्थिव अड्याळ टेकडीतील तुकारामदादांच्या समाधीला प्रदक्षिणा घालून टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या शिवारात भजन, दिंडीसह नेण्यात आला.दुपारी १ वाजताच्या सामूहिक प्रार्थना करून दादांचे पुत्र सुभाष नारखेडे, अरुण नारखेडे व मुलगी उषा नारखेडे यांच्या हस्ते चिताग्नी देण्यात आली. यावेळी वेळूरकर गुरुजी (नांदुरा), नाना महाराज (परसवाडा), चैतन्य महाराज (कांडली), मिलींद येवले, ज्ञानेश्वर रक्षक, जनार्धन बथे, चंदू पाटील मारकवार, डॉ. भाऊ थुटे, गुलाब महाराज, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, गादेवार (नांदेड), सेवक मिलमिले, रवी मानव, सुबोधदादा, डॉ. एन.एस. कोकोडे, मिलींद सुपले, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, नामदेव लोजेवार, क्रिष्णा सहारे, डॉ. कुंभारे, प्रा. वरूडकर, माणिकदादा बेलोरकर, श्यामराव मोहुर्ले यांच्यासह बहुसंख्य नागरिक आणि भगिनी उपस्थित होते.विविध भागातून गुरुदेवभक्त दाखललक्ष्मणदादांच्या अंतिम संस्कारासाठी नांदेड, नांदुरा, मोझरी, अमरावती, आंध्रप्रदेश, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व अन्य ठिकाणावरून अनेक गुरुदेवभक्त आले होते. दादांच्या अंतिम संस्कारासाठी ग्रामसंरक्षण दल चोरटी, अड्याळ, लाखापूर यांनी व्यवस्था पूर्णपणे चोख हाताळली होती.