शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल हमीभावाचा कायदा बासनात गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:28 IST

शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानेच शेतमालाची खरेदी करावी, बाजार समित्यांनी हमीभावापेक्षा कमी भावात शेतमाल खरेदी केल्यास संबंधित व्यापाºयांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचा कायदा करण्यात आला.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून पिळवणूक : बाजार समित्यांकडे शासनाचे हमीभाव परिपत्रकच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानेच शेतमालाची खरेदी करावी, बाजार समित्यांनी हमीभावापेक्षा कमी भावात शेतमाल खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचा कायदा करण्यात आला. मात्र, शासनाने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याचा जिआर (परिपत्रक) कृषी उत्पन्न बाजार स्मित्यांना दिला नसल्याने बाजार समित्यांनी हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बहुतांश बाजार समित्यांकडून हमीभावापेक्षा कमी दर देऊ न शेतकऱ्यांची आर्थिक पिळणूक करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणूक लक्षात घेता हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून दंड आकारण्याची व परवाना रद्द करण्याची शेतमाल हमीभाव कायद्यात शासनाने तरतूद केली. तशा बातम्याही वृत्तपत्रातून आणि सोशल मीडियावर झळकल्या. या कायद्याचे सर्वत्र स्तरातून स्वागत करण्यात आले. या कायद्यानुसार शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळेल, असे वाटत असतानाच शासनाने शेतकऱ्यांनी घोर निराशा केली आहे.महाराष्ट्रात कुठेच हमीभावाप्रमाणे शेतमाल खरेदी करण्याचा जीआर शासनाने कृषी बाजार समित्यांना पाठविला नाही. त्यामुळे सोयाबीनचा हमीभाव ३४५० रूपये असताना बाजार समित्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करण्याचा सपाटा लावण्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले. शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठीच शेतमाल हमीभवाचा कायदा केला काय, असा सूर आता शेतकरी वर्गात उमटू लागला आहे. याबाबत शेतकऱ्यांत असंतोष उफाळून आला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने शेतकरी मोर्चा नेला. मात्र, हमीभावासंबंधी शासनाचा कोणताही जीआर बाजार समित्यांना प्राप्त झाला नाही. त्यामुळे हमीभावाप्रमाणे आम्ही शेतमाल खरेदी करू शकत नाही, अशी भूमिका कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी मांडल्याने शासनच आता शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट आहे. कायद्याची निट अंमलबजावणी होत नसेल तर कायदे करता कशाला, असा थेट सवाल संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा केला. मात्र, शासनाने त्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही.अंमलबजावणी व्हावीशेतकऱ्यांचा शेतमाल शेतातून निघायला लागला आहे. दिवाळी तोंडावर आल्याने आर्थिक चणचण भागविण्यासाठी शेतकºयांनी शेतमाल विक्रीस काढला आहे. शासनाने हमीभाव कायद्याची अंमलबजाणी केली नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून हमीभावापेक्षा कमी दर देऊ न शेतमाल खरेदी करण्यात येत आहे.शासकीय धोरण हेच शेतकऱ्यांना मारकशासन शेतकरी हिताचे कोणतेच निर्णय घेत नाही. एखादा शेतकरीहिताचा कायदा केला तर त्याची निट अंमलबजाणी होत नाही. शासनाचे धारण हे शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करीत आहे. मात्र, शासनाला त्याचे काहीही सोयरसूतूक नाही. शासनाचे धोरण हे शेतकरीविरोधी असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. मात्र, त्याचे सरकारला काहीही घेणे देणे नाही.