शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी संकल्प सिद्धीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:49 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१७ ते २०२२ पर्यंत साकार होवू घातलेल्या व केंद्र सरकारच्या सुचनेस अनुसरून संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेल्या संकल्प.....

ठळक मुद्देअहीर यांची नियोजन बैठक : कृषी विज्ञान केंद्र, जि.प.कृषी विभाग, आत्माचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१७ ते २०२२ पर्यंत साकार होवू घातलेल्या व केंद्र सरकारच्या सुचनेस अनुसरून संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेल्या संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमाचा शुभारंभ ३१ संप्टेंबर गुरूवारी दाताळा रोड, चंद्रपूर येथील साईराम सभागृहात डॉ. पंजबराव देशमुख कृषि विद्यापीठ, आकोला अंतर्गत जिल्हा परिषद, कृषि विज्ञान केंद्र, आत्मा, कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात होत आहे.सदर कार्यक्रमाच्या आयोजनानुषंगाने केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरीष्ठ अधिकाºयांची बैठक घेवून या बैठकीत केंद्र सरकारच्या संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमाच्या अयोजनामागील पार्श्वभुमी विषद केली. यावेळी ना. अहीर यांनी अधिकाºयांना केंद्र सरकार द्वारा पुरस्कृत या कार्यक्रमाच्या संकल्प पुर्ततेकरिता उपस्थितांना आवश्यक सुचना केल्या. या बैठकीस आ.नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, जि.प.चे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, कृषि विज्ञान केंद्राचे प्रणिता धुमाळ, आत्माचे मगर, कृषि विभागाचे कृषि उपअधिक्षक चवले यांचेसह अनेक विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांचा सूचनेनुसार केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकार पुरस्कृत विधि विकास योजनाबरोबरच कृषि सिंचन, विद्यूत, वैयक्तिक लाभ आदी योजना संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमातून जनतेपर्यंत पोहचवीणे, हा उद्देश असल्याने या कार्यक्रमात सर्वच समाज घटकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री व भाजप लोकप्रतिनिधींनी केले आहे.या संकल्प सिध्दी कार्यक्रम ग्रामीण विकास, शेती विकास, समृध्द शेतकरी संकल्पना साकारण्यास कृषि उत्पन्नात वाढ, ग्रामीण रोजगारात वृध्दी, विविध जोडधंदे, शेतीपुरक उद्योग, विविध विचार, संकल्पनांच्या माध्यमातून विकासाला गती देतांनाच केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ग्रामीण क्षेत्रातील सरपंच ग्रा. पं. सदस्य, पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, शासन योजना कार्यान्वयन अधिकारी, कर्मचारी, विभाग प्रमुख,शेतकºयांचा सहभाग, कृषि तज्ज्ञ, पशु पालक, कुकूटपालक, शेळीमेंढी पालक, मत्स्य व्यवसायी, मधुमक्षीका पालक व या सर्व व्यवसायातील लोकांचा सहभाग राहिल.या कार्यक्रमाद्वारे विविध विषयावरील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन होणार आहे.