शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

वेकोलि वसाहतीतील दूरसंचार कार्यालयाला अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:48 IST

वेकोलि वसाहत एकतानगर स्थित दूरसंचार कार्यालयात सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी जनरेटर व बॅटरीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

जनरेटर नादुरुस्त : बॅटरीची क्षमता कमी, ग्राहकांचे हालचारगाव खदान : वेकोलि वसाहत एकतानगर स्थित दूरसंचार कार्यालयात सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी जनरेटर व बॅटरीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र गत एक महिन्यापासून जनरेटर नादुरुस्त अवस्थेत तर उपलब्ध असलेली एक बॅटरी कमी क्षमतेची असल्याने येथील दूरसंचार सेवा वारंवार खंडीत होत आहे. याचा फटका ग्राहकांसोबतच विद्यार्थ्यांना बसत असून आतापर्यंत दूरसंचार विभागाने दखल घेतली नसल्याने ग्राहकांमध्ये रोष पसरला आहे.भद्रावती शहराच्या थोड्याच अंतरावर वेकोलि वसाहतआहे. या वसाहतीत जवळपास ५०० हून अधिक दूरसंचारचे ग्राहक होते. मात्र दूरसंचारच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांची संख्या कमी होवून १४० वर आली आहे. ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असताना सुद्धा दूरसंचार विभागा सेवेत सुधारणा करायला तयार नाही. या प्रकारावरून अधिकाऱ्यांचा ग्राहकांशी काहीच देणे-घेणे नाही, असेच दिसून येते. वीज सेवा कधीही खंडीत होत असते. कधी रात्रभर तर कधी कितीही वेळ वीज पुरवठा बंद असते. विद्युत सेवा बंद पडली की, मोबाईल, ब्रॉडबॅण्ड व एक्स्चेंज या सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी जनरेटरची व बॅटरीची व्यवस्था केलेली असते. एकतानगर वसाहतीतील दुरसंचार केंद्रात जनरेटर व बॅटरीची व्यवस्था आहे. मात्र २३ जूनपासून जनरेटर नादुुरुस्त स्थितीत असून बॅटरीची क्षमता कमी आहे. बॅटरीवर सेवा सुरु करण्यासाठी ५४ व्होल्टेज लागतो. मात्र एक तास बॅटरी चालली की ४७ ते ४८ व्होल्टेज येतो, तर ४० वरती सेवा बंद पडते. जनरेटर बंद असल्यामुळे येथे दोन बॅटऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र याकडे कोणताही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. परिणामी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)कर्मचारी म्हणतात, अधिकारी लक्ष देत नाहीत याबाबत मेकॅनिकल गुरूनुले यांची विचारणा केली असता, ग्राहक माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात, मला बोलतात. मात्र माझ्या हातात काहीच नाही. याबाबत मी वरिष्ठांकडे सतत समस्या मांडतो. मात्र वरिष्ठ अधिकरी लक्ष द्यायला तयार नाही, असे सांगितले. तर उपअभियंता पाडेवार यांची विचारणा केली असता, आयुध निर्माणी, भद्रावती, माजरी व एकता नगर येथे जनरेटर व बॅटरीची आवश्यकता आहे. नादुरुस्त असलेले जनरेटर बदलवून देण्याची आमची मागणी आहे. मात्र या कामाला वेळ लागेल, असे सांगितले.