शेतकऱ्याची तक्रार : वेळेवर नोटीस पाठवून केली जातेयं मोजणीनांदाफाटा : कोरपना येथील भूमी अभिलेख कार्यालयामार्फत अनेक शेतकऱ्यांच्या शेत मोजणीचे काम अर्ज प्राप्त झाल्यानंतर केले जात आहे. मात्र यात मोजणी अधिकारी एकेरी बाजू घेऊन वेळेवर मोजणीचे नोटीस पाठवून शेतकऱ्यांच्या गैरहजेरीत मोजणी करीत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. कवठाळा येथील सुभाष राऊत यांची राजुरा न्यायालयात १४ जुलै २०१५ रोजी पेशी होती. हाच डाव साधत कोरपना येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकारी यांनी १४ जुलै रोजी संजय गोहणे यांना सोबत घेऊन शेताची मोजणी केली. कवठाळा येथील सर्वे नंबर १९२/२ व १९२/३ या शेताचा वाद सुभाष राऊत आणि संजय गोहणे यांच्यामध्ये वारंवार निर्माण होत आहे. कवठाळा येथील मारोती राऊत यांचेकडून हनीफ मावडीया व रेश्मा मावडीया यांनी सहा एकर शेती विकत घेतली. मात्र हिच जमीन सुभाष राऊत यांची वडिलोपार्जित असून जमीन मूळ मालक रघू राऊत यांचे नावाने नऊ एकर शेती होती. या जमिनीचे हिरामण राऊत व मारोती राऊत या दोन मुलांमध्ये वाटणी झाली. यातील १.२० हेक्टर जमिनीचे बक्षिसपत्र सुभाष राऊत यांना दिले आहे. तर मारोती राऊत यांच्याकडे सहा एकर जमिन शिल्लक न राहता त्यांनी जमिनीची विक्री केली कशी, असा प्रश्न आहे.यातच शेतकऱ्याने मोजणीची तारीख रद्द करण्याचा अर्ज दिल्यानंतरही शेतात जावून बळजबरीने कुणीही घरी नसताना अधिकाऱ्यांनी मोजणी केली आहे. शेतीच्या मोजणीच्या वेळी दोनही शेतीमालकांना हजर राहणे गरजेचे आहे. मात्र सुभाष राऊत हा शेतकरी व कुटुंबीय घरी नसताना मोजणी केली आहे. त्यामुळे न्याय मिळाला नसल्याने सुभाष राऊत यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे तक्रार केली आहे. तालुक्यात शेतजमिनीची अनेक प्रकरणे असून भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना मानसीक त्रास देत असल्याची ओरड होत आहे. संबंधित विभागाने याकडे त्वरीत लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारशेतकऱ्याने मोजणीची तारीख रद्द करण्याचा अर्ज दिल्यानंतरही शेतात जावून बळजबरीने कुणीही घरी नसताना अधिकाऱ्यांनी मोजणी केली आहे. शेतीच्या मोजणीच्या वेळी दोनही शेतीमालकांना हजर राहणे गरजेचे आहे. मात्र सुभाष राऊत हा शेतकरी व कुटुंबीय घरी नसताना मोजणी केली आहे. त्यामुळे न्याय मिळाला नसल्याने सुभाष राऊत यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे तक्रार केली आहे. मोजणीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज येताच आॅनलाईन पद्धतीने तारखा दिल्या जातात. कवठाळा येथील सुभाष राऊत यांच्याकडे जमिनीचे केवळ बक्षिसपत्र आहे. त्यांच्याकडे कुठेलेही इतर कागदपत्रे नाही. संजय गोहणे यांना मारोती राऊत यांनी शेती विकली असून आज ती शेती गोहणे यांच्या नावाने आहे. तरी सुभाष राऊत हे आपला दावा सांगत असले तरी मोजणी रितसर केली नसल्याचे आरोप खोटे आहे.- एस.एस. जाधवभूमी अभिलेख अधिकारी कोरपना
भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार
By admin | Updated: August 3, 2015 00:43 IST