शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ेटॉवरच्या जमिनीचा मोबदला मिळणार

By admin | Updated: November 11, 2016 01:04 IST

शेतकऱ्यांच्या शेतात मोठ-मोठी टॉवर्स उभे केले जात असल्यामुळे जवळपास सहा गुंठे जमीन कायमस्वरूपी वाया जाते.

खांबाला २ लाख ५० हजार देण्याची मागणीचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या शेतात मोठ-मोठी टॉवर्स उभे केले जात असल्यामुळे जवळपास सहा गुंठे जमीन कायमस्वरूपी वाया जाते. काम करताना जवळपास ८ ते १० गुंठे जमिनीवरील पिकांचे नुकसान होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पूर्ण टॉवर आल्यास त्याला १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावीे, अशी मागणी २०१४ पासून टॉवर विरोधी कृती समितीने वेळोवेली शासनाकडे केली होती. ती मागणी आता मान्य झाली आहे.राज्यात सन २०१० नंतर ४०० के.व्ही. पुढील कामे सुरू झाली. राज्यात प्रामुख्याने १४ जिल्ह्यात ही कामे सुरू आहेत. विद्युत लाईनची कामे करताना टॉवर विरोधी कृती समितीच्या प्रचंड दबावामुळे व पाठपुराव्यामुळे आता शासन निर्णय १ नोव्हेंबर २०१० नुसार, शेतकऱ्यांना टॉवरखाली येणाऱ्या जमिनीचा मोबदला बाजारभावानुसार देण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणचे बाजारमूल्य गृहीत धरताना कोरडवाहू, बागायत, फळबागांची जमीन व शहरी भागात तसेच रस्त्यालगत असे वर्गीकरण करण्यात आले आहे. परंतु जमीन अधिग्रहण न करता मोबदला देण्यात येणार आहे. जमिनीचा मोबदला कोरडवाहुला २५ टक्के, बागायतला ५० टक्के, फळबागांना ६० टक्के व रस्त्यालगतच्या जागेला ६५ टक्के असे वर्गीकरण केले असून ते योग्य नाही. सरसकट २० गुंठे जमिनीचे नुकसान गृहीत धरून मोबदला द्यावा यासाठी शासन निर्णयात बदल करावा लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास कमीत कमी ७५० व जास्तीत जास्त १२०० टॉवर्स आलेले आहेत. यामुळे ६ ते ८ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर आले नाही. फक्त तार गेली असेल तर बागायत शेती असल्यास २ लाख रुपये व कोरडवाहू शेती असल्यास १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मंजूर करण्याचा शासनाचा विचार आहे. जर फक्त रस्ता गेला असेल तर १०० फुट लांबी पर्यंत ५० हजार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)