शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अवैध उत्खननाने शासनाला लाखोंचा फटका

By admin | Updated: November 4, 2014 22:38 IST

खनिज संपत्तीच्या उत्खननाची परवानगी देऊन मोकळ्या झालेल्या स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. प्रशासनातील कर्मचारी

विरुर (स्टे.) : खनिज संपत्तीच्या उत्खननाची परवानगी देऊन मोकळ्या झालेल्या स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. प्रशासनातील कर्मचारी ‘अर्थ’पूर्ण हित जोपासून अतिशय सोयीस्कररित्या या चोरीवर पडदा टाकल्या असल्याचे दिसून येत आहे. राजुरा तालुक्यातील अनेक नदी नाल्यांमध्ये तसेच वनविभाग व महसूल विभागाच्या जागेवर चांगल्या दर्जाची रेती व विटाभट्टीला लागणारी पोषक माती अशा खनिजांचा विपूल साठा आहे. दगडखाली, रेतीघाट व मुरुम यापासून उत्खननातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मात्र अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने तालुक्यात दगड, गिट्टी, मुरुम, रेती या खनिजांची तस्करी केली जात आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसरातून गेल्या काही महिन्यांपासून विविध घाटावरुन गौणखनिज साहित्य दगड, गिट्टी, मुरुम, रेतीची सर्रासपणे चोरी केल्या जात असून अशा गंभीर बाबीकडे पोलीस विभाग, महसूल विभाग व वनविभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रेती माफियांच्या धुमाकूळामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल तिजोरीत न जाता अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत. या माफियांवर ज्या अधिकाऱ्यांनी आळा घालायला पाहिजे, तेही शासनाच्या हिताकडे दुर्लक्ष करुन स्वत:चा फायदा बघून आंधळ्याची भूमिका बजावीत आहेत.यंदा पूर आल्यामुळे नदी-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेतीचा साठा जमा झाला. पावसाळ्याचे दिवस संपताच घरांच्या बांधकामांना सुरुवात होते. रेती माफियांनी चोरलेले गौन खनिज बेभावाने विकल्या जात आहे. एक हजार रुपयात एक ट्रॅक्टर मिळणारी रेती एक हजार ५०० ते दोन हजार रुपयांत विकण्याचा सपाटा रेती माफियांनी सुरू केला आहे. त्यातून गौन खनिज साहित्याची चोरी करुन शासनाचा लाखो रुपये महसूल बुडवून गरीब जनतेची आर्थिक लुबाडणूक करीत आहे. या चोरट्या वाहतुकीकडे कुणाचेही लक्ष दिसत नसल्याचे दिसून येत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व रेती अवैधरीत्या नदी नाल्यातून उचलून गडचांदूर, कोरपना, जिवती व आंध्र प्रदेशात पोहचविल्या जात आहे. या सर्व कंत्राटदारांना राजकीय वरदस्त असल्यामुळे संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. रेती उपशामुळे नदी पात्रात बदल होण्याचा व पर्यावरणास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस विभाग, महसूल विभाग व वनविभागाच्या कर्तव्यावर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत गौन खनिज चोरीचा प्रकार सुरू आहे. (वार्ताहर)