शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तलाव सौंदर्यीकरणाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:13 IST

येथे तीन मोठे तलाव असून उन्हाळ्यातही येथे मुबलक पाणी असते. परंतु, एकाही तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. यापैकी दोन मोठ्या तलावावर नौकायानची व्यवस्था केल्यास ब्रह्मपुरीकरांंसाठी ‘सोने पे सुहागा’ असा आनंद भविष्यात उपभोगता येऊ शकते.

ठळक मुद्देकामे अर्धवट : ब्रह्मपुरी शहरवासी नौकायानच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : येथे तीन मोठे तलाव असून उन्हाळ्यातही येथे मुबलक पाणी असते. परंतु, एकाही तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. यापैकी दोन मोठ्या तलावावर नौकायानची व्यवस्था केल्यास ब्रह्मपुरीकरांंसाठी ‘सोने पे सुहागा’ असा आनंद भविष्यात उपभोगता येऊ शकते. परंतु, त्या दृष्टीने वाटचाल नसल्याने नौकायानच्या प्रतिक्षेत असल्याची भावना ब्रह्मपुरीकर व्यक्त करीत आहेत.कोट तलाव (शुक्रवारी तलाव), बारई तलाव व लेंडारी तलाव असे ब्रह्मपुरी शहरात तीन मोठे तलाव आहेत. या तलावात पाणी संचयनाशिवाय दुसरे कोणतेही कार्य होताना दिसत नाही. यापैकी कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाला मोठ्या धुमधड्याक्यात सुरुवात करण्यात आली. मात्र तेवढ्याच धुमधडाक्यात कामही बंद पडल्याचे चित्र दिसून येत आहे. कोट तलावाचे सौंदर्यीकरण हे ब्रह्मपुरीकरांसाठी आनंदाची पर्वणी होती. पण ही पर्वणी हवेत विरली. मात्र कोट तलावावर अजूनही पैसे खर्च केले जात आहेत. लाकूड लावणे व पायऱ्या तयार करुन त्यावर बैठक व्यवस्था निर्माण केली जात आहे. परंतु, या कामाची जो तो आपल्यापरीने विल्हेवाट लावत असल्याने कामाचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. या सर्व बाबींवरुन या तलावाचे सौंदर्यीकरण आजपर्यंत पूर्ण झाले असते तर या उन्हाळ्यात पर्यटकांना व नागरिकांना नौका विहाराची हौस पूर्ण करता आली असती.बारई तलाव खासगीशहराच्या मध्यवर्ती भागात असलेले बारई तलाव हे खाजगी मालकीचे असल्याने येथे नौकायानची सध्या तरी हौस पूर्ण करता येणार नाही. परंतु, बारई तलावामुळे ब्रह्मपुरी शहरातील विहिरींची पाण्याची पातळी कायम टिकून असते.लेंडारी तलावही सुशोभीतलेंडारी तलावावरही किनाऱ्यावर पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र या ठिकाणी कुणीही फिरतक नाही. त्यामुळे नगरपरिषदेने केलेला खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येते.बगिच्याच्या मागणीकडे दुर्लक्षअनेक नागरिक फिरण्यासाठी घराच्या बाहेर पडतात. सध्या शहरात हुतात्मा स्मारक बगिचा व शेषनगर बगीचा सुसज्य आहेत. या बगिच्यात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची गर्दी असते. मात्र मागणी करुनही खेळणे व अन्य सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे.