शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लाखो गुरुदेव भक्तांनी घेतले तपोभूमीचे दर्शन

By admin | Updated: January 5, 2015 23:00 IST

दरवर्षी गोंदोडा गुंफा यात्रेला गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपश्चर्येने गोंदोडा ही भूमी पावन झाली आहे. या भूमीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील

चिमूर : दरवर्षी गोंदोडा गुंफा यात्रेला गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपश्चर्येने गोंदोडा ही भूमी पावन झाली आहे. या भूमीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व गुरुदेव भक्त ५ जानेवारीला आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून राष्ट्रसंताच्या तपोभूमीचे दर्शन घेतात. परंतु, या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस येणार अशी माहिती मिळाल्यामुळे असंख्य गुरुदेव भक्तांनी तपोभूमीत उपस्थिती दर्शविली. राष्ट्रसंताना भारतरत्न पुरस्कार मिळणार अशी आशा बाळगुण आपल्या लहान मुलांसह बैलबंडी, पायदड तथा वेगवेगळ्या साधनांनी या तपोभूमीत भक्त उपस्थित झाले. परंतु, राज्याचा एकही मंत्री न आल्यामुळे गुरुदेव भक्त तीव्र नाराज झाले. गुरुदेव भक्तांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी राष्ट्रसंताना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन देऊन त्यांनी चिमूर व गोंदोडा परिसरात अनेक ठिकाणी फलक लावले. त्यामुळे गुरुदेव भक्तांना आमदाराकंडून आशा आहे.अवघ्या लहान वयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गोंदोडा या जंगल परिसरात तपश्चर्या केली. नेरी परिसरात अनेक गुरुदेव भक्तांना एकत्रीत करुन ग्रामपंचायत नेरी चे उद्घाटन केले. त्यांनी आपल्या काळात आरोग्यसेवा दिली. गोंदोडा परिसरात तालुक्यातील गुरुदेव भक्तांना एकत्रीत आणून एक मोठी यात्रा भरविली. त्या यात्रेत तुकडोजी महाराजांनी सर्वांना सर्वधर्म समभावचा संदेश दिला. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ‘झाड झडूली शस्त्र बनेंग,े भक्त बनेगी सेना. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नान लगेगी किनारे’ असा मंत्र देत देशाला स्वातंत्र मिळवून दिले. सर्वात प्रथम देशामध्ये चिमूर हे गाव स्वतंत्र झाले. परंतु त्याच व्यक्तीचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी समोर येत नाही. राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, ते चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. तसेच ज्यांनी राष्ट्रसंताना भारतरत्न मिळावा याचा पाठपुरावा केला ते जिल्ह्याचे पालकमंत्री असून राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे गुरुदेव भक्तांना यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे तपोभूमीमध्ये दर्शन घेण्यासाठी व राष्ट्रसंताना भारतरत्न मिळावा म्हणून गावागावातील लहानांपासून ते वृद्धापर्यंत संपूर्ण भक्त पायदळ, बैलबंडी, तपोभूमीत पोहचले. परंतु एकही मंत्री न आल्यामुळे त्यांची निराशा झाली. (तालुका प्रतिनिधी)