शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिसीच्या सरपंचांना लाखाचा दंड

By admin | Updated: May 7, 2017 00:29 IST

ग्रामपंचायत भिसीचे सरपंच अरविंद रेवतकर यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना तिसरे अपत्य असल्याचे ....

पदावर गंडांतर : अपत्याची लपविली माहितीलोकमत न्यूज नेटवर्कभिसी : ग्रामपंचायत भिसीचे सरपंच अरविंद रेवतकर यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना तिसरे अपत्य असल्याचे दडवून खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने अरविंद रेवतकर यांना एक लाख पाच हजाराचा दंड ठोठावला. न्यायाधीश झेड. ए. हक यांनी ही रक्कम संबंधित प्रतिवादींना देण्याचे आदेश दिले.रेवतकर यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना तिसरे अपत्य झाल्याची बाब लपवून ठेवल्याबद्दल धनराज मंगले यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रेवतकर यांना सदस्य म्हणून अपात्र घोषित केले. यानंतर त्यांनी उपविभागीय आयुक्तांकडे अपील केले. त्यांचे अपील उपविभागीय आयुक्तांनी नाकारले. यामुळे त्यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले.नागपुरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये रेवतकर यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. परंतु त्यांनी हायकोर्टात शपथपत्र दाखल करून तिसरे अपत्य झाले नसल्याची खोटी माहिती दिली. हायकोर्टाने संबंधित हॉस्पीटलच्या डॉक्टरला नोटीस बजावून माहिती मागितली. डॉक्टरने हायकोर्टाला माहित दिली की रेवतकर यांची पत्नी हॉस्पीटलमध्ये भरती होती आणि त्यांना तिसरी मुलगी झाली. तीन अपत्ये असल्यास निवडणूक लढविता येत नाही. असा कायदा असतानाही रेवतकर यांनी तिसऱ्या अपत्याची माहिती लपवून हायकोर्टाची दिशाभूल केली, असे अ‍ॅड. नितीन खांबोरकर यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. हायकोर्टाने रेवतकर यांच्यावर एक लाख पाच हजार रुपयांचा खर्च बसविला आणि जिल्हाधिकाऱ्यांना २५ हजार, उपविभागीय आयुक्तांना २५ हजार, तसेच ग्रामपंचायतीला ५० हजार, आणि डॉक्टरला पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिलेत.यासंदर्भात भिसी ग्रामपंचायतीचे सरपंच अरविंद रेवतकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून या घटनेविषयी विचारणा केली असता रेवतकर म्हणाले, नागपूर खंडपिठाने दिलेला निर्णय सत्य असून मी लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार आहे. या प्रकरणामुळे सरपंच अरविंद रेवतकर यांच्या सरपंच पदावर गदा येणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.