शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांनीच ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:14 IST

सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची घटना ताजी असताना पाचगाव येथील सरपंचांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने सर्वच शासकीय विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे.

ठळक मुद्देपाचगाव येथील घटना : शासकीय विकासकामांचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची घटना ताजी असताना पाचगाव येथील सरपंचांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने सर्वच शासकीय विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीचे सर्वच व्यवहार ठप्प पडले आहे.राजुरा तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. मागील महिन्यात येथील सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची बोंब ताजी असतानाच येथील सरपंच रसिका उदे यांनी दोन दिवसांपूर्वी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकले. मात्र असे कुलूप लावण्याविषयी कोणाचीही परवानगी घेण्यात आली नाही. किंवा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत असा कोणताच ठराव घेण्यात आला नाही. मग गावाचा प्रथम नागरिक असतानाही सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पाडण्याचा अधिकार कुणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ग्रामपंचायतीला दोन दिवसांपासून कुलूप असल्याने ग्रा.प. कार्यालयातून होणारे सर्वच व्यवहार ठप्प पडले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने होणारा नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद पडला असून गावकºयांचा पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. गावकºयांना व विद्यार्थ्यांना लागणारे रहिवासी दाखले ना हरकत प्रमाणपत्र व ग्रामपंचायतीचे सर्वच शासकीय कामांचा खोळंबा झाला असून शासकीय कामात सरपंच अडथळा आणत असल्याचा आरोप उपसरपंच गोपाल जंबुलवार यांनी केला आहे. सरपंचांवर कारवाई करुन अपात्र घोषित करावे, अशी मागणी उपसरपंच गोपाल जंबुलवार यांनी जिल्हाधिकाºयाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. याबाबत सरपंच रसिका उदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.गावाचा प्रथम नागरिक असलेल्या सरपंचांनीच ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. याबाबत कुणालाही माहिती दिली नाही किंवा कुणाची परवानगीही घेतली नाही. हे सर्व काम नियमबाह्य असून ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार ठप्प पडले असून सरपंचावर कडक कारवाई करावी.- गोपाल जंबूलवार, उपसरपंच,पाचगाव