शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणासाठी मनपाकडे निधीची चणचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST

चंद्रपूर : सुमारे ३ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरात फक्त सहा केंद्र असून आतापर्यंत २५ हजार ...

चंद्रपूर : सुमारे ३ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरात फक्त सहा केंद्र असून आतापर्यंत २५ हजार ६४१ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आजपासून ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील प्रत्येकालाच लस देणे सुरू झाले. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत २७ टक्के म्हणजे ९५ हजार ९५४ नागरिक या वयोगटात येतात. मात्र, मर्यादित केंद्र व मनुष्यबळाअभावी याच गतीने लसीकरण शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर मनपाने ६३ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव नुकताच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

चंद्रपूर शहरात सहा लसीकरण केंद्र सुरू आहेत. लोकसंख्येचा विचार केल्यास लसीकरण केंद्रांची संख्या पुरेशी नाही. ४५ वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस द्यायची तर केंद्रांची संख्या, मनुष्यबळ व त्यासाठी संभाव्य आर्थिक समस्येचा अंदाज चंद्रपूर महानगर पालिकेला आला. त्यामुळे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त विशाल वाघ व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी पुढील ४५ दिवसांच्या लसीकरणाचा कृती आराखडा काही दिवसांपूर्वीच तयार केला. हा आराखडा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे सादर करून त्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता ६३ लाखांची मागणी करण्यात आली आहे.

७० हजार ३१३ जणांचे लसीकरण शिल्लक

लसीकरणासाठी पात्र वयोगटातील चंद्रपुरातील ९५ हजार ९५४ नागरिकांपैकी २५ हजार ६४१ जणांचे लसीकरण झाले. उर्वरित ७० हजार ३१३ जणांचे लसीकरण शिल्लक आहे. खर्चाची तरतूद नसल्याने आवश्यकता असूनही मनपाने केंद्रांची संख्या वाढविली नाही. मात्र, केंद्रनिहाय उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष दिले जात आहे.

चंद्रपुरात १४ केंद्रांची गरज

शहरात दररोज ६०० नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. ७० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी १४ केंद्रांची गरज आहे. या केंद्रांमध्ये ४५ दिवस लसीकरण सुरू ठेवण्यास मनुष्यबळ व त्यांच्या मानधनासाठी २१ लाखांचा खर्च या आराखड्यात गृहीत धरण्यात आला. याशिवाय संभाव्य १८, १३ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटाला लस देण्याची केंद्र सरकारने घोषणा केल्यास त्यासाठीही ४२ लाखांचा अपेक्षित खर्च या आराखड्यात नमूद केला आहे.