शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

By admin | Updated: June 8, 2014 23:48 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी शहरातील खासगी रक्तपेठीकडे धाव घ्यावी लागत आहे. यात आर्थिक तथा शारीरिक ताण सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी शहरातील खासगी रक्तपेठीकडे धाव घ्यावी लागत आहे. यात आर्थिक तथा शारीरिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत मागील काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.  प्रदूषण आणि इतर कारणांमुळे रुग्णांच्या संख्येत दिवेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात सिकलसेल रुग्णांची संख्याही मोठी आहे. मात्र  त्या तुलनेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेठीत रक्ताचा साठा कमी पडत आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान शिबिर तसेच रक्तदात्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुडवडा आहे. अतीगंभीर, सिकलसेल तसेच अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे रुग्णालयातील रक्तपेठीमध्ये काही प्रमाणात रक्ताचा साठा आहे. मात्र साठा कमी आणि पुरवठा जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना नाईलाजाने खासगी रक्तपेठीकडे धाव घ्यावी लागत आहे. हिच संधी साधत खासगी रक्तपेठी संचालक रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम वसुल करीत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. अपघात, सिकलसेल, प्रसूती तसेच इतर आजारी रुग्णांना तत्काळ रक्त पुरवठा करणे तितकेच महत्त्वाचे आहे.  सामाजिक संस्था, विद्यार्थी तसेच तरुणांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी, अशी विनंती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. ( नगर प्रतिनिधी)