शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशाळा, ग्रंथालयाविना विद्यालय

By admin | Updated: August 6, 2014 23:44 IST

प्रत्येक विद्यार्थ्याला अत्याधुनिकपद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. यासाठी आरटीई अ‍ॅक्ट २००९ सुद्धा अंमलात आणला आहे. मात्र काही शिक्षण संस्थाचालक केवळ अनुदान मिळेल,

चंद्रपूर : प्रत्येक विद्यार्थ्याला अत्याधुनिकपद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. यासाठी आरटीई अ‍ॅक्ट २००९ सुद्धा अंमलात आणला आहे. मात्र काही शिक्षण संस्थाचालक केवळ अनुदान मिळेल, या आशेवर विद्यालय सुरु करून कोणत्याही सुविधा न पुरविता विद्यार्थ्यांच्या भविष्याची अक्षरश: खेळ करीत आहे. जिल्ह्यातील अशा अनेक शाळांवर कारवाई करणे गरजेचे आहे. चंद्रपूर येथून सात कि.मी. अंतरावर असलेल्या लोहारा येथील सम्राट अशोक हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा वेगळीच आहे.या शाळेमध्ये दहाव्या वर्गात ६२, नवव्या वर्गात १७ आणि आठव्या वर्गात केवळ एक विद्यार्थी ज्ञानर्जन करीत आहे. ज्या इमारतीमध्ये शाळा आहे. त्या इमारतीमध्ये तळमजला आणि पहिल्या माळ्यावर अनेक कुटुंबियांचे वास्तव्य आहे. येथेच शाळा भरते. समोर मोठे पटांगण आहे. मात्र सदर पटांगण संस्थेच्या मालकीचे नसल्याने त्याचा वापर होत नाही. विशेष म्हणजे, दुसऱ्या माळ्यावर शाळा असतानाही विद्यार्थ्यांचे मुत्रीघर तळमजल्यावर आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिंंनीसाठी एकच शौचालय आहे. या समस्या असल्या तरी ज्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते त्या क्षमतेसाठी शैक्षणिक साहित्य आणि वातावरणाची गरज असते. ते येथे नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही.अडगळीत असलेल्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहे. तेथे प्रयोगशाळा तसेच ग्रंथालयसुद्धा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.काही दिसापूर्वी मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी लोहारा गावाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी शाळेसंदर्भात सीईओंकडे तक्रार केली होती. या तक्रारीची त्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित शाळेची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने या शाळेची तपासणी केली असता, अनेक त्रुट्या आढळून आल्या. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.शाळा तपासणी पथकामध्ये उपशिक्षणाधिकारी माध्यमिक टेभुंर्णे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक फटिंग, माजी उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)