शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बँकांमध्ये लाबंच लांब रांगा

By admin | Updated: November 11, 2016 00:59 IST

मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा होताच बुधवारपासून नागरिकांची भागम्भाग सुरू झाली आहे.

अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त : नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची भागम्भागचंद्रपूर : मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा होताच बुधवारपासून नागरिकांची भागम्भाग सुरू झाली आहे. बुधवारी बंद असलेल्या बँका गुरूवारी सकाळी सुरू होताच ग्राहकांची एकच गर्दी झाली. त्यामुळे जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.नोटा बदलून देण्यासाठी शासनाने मुदत दिली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा आहेत, त्यांची बुधवारी सकाळपासूनच धावपळ सुरू दिसली. नोटा बंद झाल्याच्या भितीने अनेक व्यवसायिकांनी ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. तर पेट्रोल पंप, रूणालये, रेल्वे टिकीट घर, बस प्रवासादरम्यान नोटा स्वीकारणे अनिवार्य असतानाही सुट्टे नसल्याच्या कारणावरून नोटा स्वीकारण्यात आले नाही. परिणामी गुरूवारीही सर्वत्र प्रचंड गोंधळ उडालेला दिसून आला. गुजरी बाजारातही चिल्लर अभावी शुकशुकाट दिसून आला. (स्थानिक प्रतिनिधी)नोटा बदलून घेण्यासाठी कमिशन गुरूवारी सकाळी बँका सुरू होताच ग्राहकांना दोन हजारच्या नवीन नोटा देण्यात आल्या. त्यामुळे अनेक ग्राहक कौतुकाने नवीन नोटा निरखुन पाहत होते. बचत खात्यावर रक्कम जमा करणाऱ्यांची अलोट गर्दी होत असतानाच नोटा बदलून घेण्यासाठीही वेगळ्या रांगा बँकेत लागलेल्या दिसल्या. मात्र यात ४ हजार रूपयांपर्यंतच नोटा बदलून दिल्या जात असल्याने काहींनी कमिशनवर दुसऱ्या व्यक्तीला रांगेत उभे करून नोटा बदलून घेतल्या.