शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कुसुंबी शेतजमीन प्रकरण मुख्यमंत्र्याच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:58 IST

जिल्ह्यातील दी सेंचुरीटेक्स माणिकगड सिमेंट कपनीने कुसुंबी येथील आदिवासी कुटुंबाची जमीन हस्तांतरित केली. मात्र त्यांचे पुनर्वसन केले नाही. परिणामी सर्व कुटुंब उघड्यावर पडले. त्यामुळे या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संजय धोटे यांच्या नेतृत्वात नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

ठळक मुद्देसंजय धोटे यांचे निवेदन : पुनर्वसन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : जिल्ह्यातील दी सेंचुरीटेक्स माणिकगड सिमेंट कपनीने कुसुंबी येथील आदिवासी कुटुंबाची जमीन हस्तांतरित केली. मात्र त्यांचे पुनर्वसन केले नाही. परिणामी सर्व कुटुंब उघड्यावर पडले. त्यामुळे या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संजय धोटे यांच्या नेतृत्वात नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.सिमेंट कंपनीने कुसुंबीतील नऊ शेतकऱ्यांची जमीन बळकावली. सदर शेती नष्ट करुन त्यावर चुनखडीचे खनन सुरु केले. शेतीत अनावश्यक माती टाकून बाधित केली. तसेच जमीन घेतेवेळी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक वर्षे लोटुनही त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही.शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलन केले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आदिवासींवर झालेला हा अन्याय दूर करण्याची मागणीचे निवेदन आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जनसत्याग्रह संघटनेचे आबिद अली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी प्रकरणाची चौकशी करुन न्याय देण्याचे आश्वासन दिले.चुकीचा अहवालकुसुंबी शिवारात वन विभागाची ४ हेक्टर ५० आर जमीन महसुली अभिलेखात ७/१२ मध्ये नोंद आहे. मात्र भूमापन नकाशा सिमांकन शिवार दगडाचा आधार व मोजणी न करता चुकीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. परिणामी आदिवासी कोलाम निजामकालीन १९४३ पासुन नकाशामध्ये मालकी हक्क व सिमांकन असताना चुकीच्या पद्धतीने ताबा दिल्यामुळे उघडयावर पडले आहेत.