शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुकुडसाथ गावाने विकास कामात घेतली आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:55 IST

कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडी कार्यक्रमात कोलांडी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडी कार्यक्रमात कोलांडी येथे केले.वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीच्या आठव्या दिवशीची सुरूवात जिवती तालुक्यातील कोलांडी गावापासून करण्यात आली. वृक्षदिंडी कोलांडी, कुंभेझरी गावातून वाजतगाजत निघाली. कुकुडसाथ व नारंडा गावात पोहोचल्यानंतर वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. दिंडीसह महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गोदावरी केंद्रे जिल्हा परिषद सदस्य कमला राठोड, जिवती पंचायत समितीचे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकाते, पंचायत समिती सदस्य अंजना पवार, कोरपना तालुक्यात दिंडीसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कोरपना पंचायत समितीचे सभापती शाम रणदिवे, उपसभापती संभाशिव कोडापे, आशिष ताजणे व गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. शाम रणदिवे म्हणाले, ग्राम विकास हा पैशानी होत नाही. याला सुसंवादाची गरज असते. ग्रामसविकासाचा संवाद कुकुडसाथ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भुजंग सुर्यवंशी यांनी गावात घडवून आणला. दिंडी दरम्यान गावस्तरावर विविध विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. नारंडा गावात ही दिंडी बैलगाडीवर सजवून गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली. गावात भव्य विराट दिंडीचे स्वरुप निर्माण झाले. यावेळी जिवती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बागडे, कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान