शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

300 बालकांना कोविड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

बुधवारी मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५७ बाधितांचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १०७ बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १७ हजार ९५१ वर पोहोचली आहे. 

ठळक मुद्देनवे १०७ बाधित : लक्षणे दिसताच बालकांना ठेवा दूर

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत ० ते ५ वयोगटातील तब्बल २९९ बालकांना कोरोना विषाणूने आपल्या कवेत घेतले आहे. बालकांना हा आजार निश्चितच पालक व किंवा नातेवाईकांकडून होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पालकांना किंवा घरात येणाºया कोण्याही व्यक्तींमध्ये लक्षणे दिसली की बालकांना त्यांच्यापासून दूर ठेवणे आता गरजेचे झाले आहे. बुधवारी १०७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून ६१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.बुधवारी मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५७ बाधितांचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १०७ बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १७ हजार ९५१ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १५ हजार ४८३ झाली आहे. सध्या दोन हजार १९१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३२ हजार १११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे,  त्यापैकी एक लाख १२ हजार ५७० नमुने निगेटिव्ह आले आहे.बाजारात गर्दी ओसरली, मात्र नियमांचे पालन नाहीदिवाळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील बाजारपेठेत मागील चार-पाच दिवसांपासून तुंबळ गर्दी उसळली होती. ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या गर्दीमुळे आणि कापडाच्या दुकानातील ‘ट्रायल’ कोरोना संसर्गाची शक्यता बळावली होती. बुधवारपासून बाजारपेठेत गर्दी कमी झाली आहे. मात्र नागरिक अद्यापही नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते. अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो. सोशल डिस्टन्सिंग तर कोणत्याच दुकानात दिसून येत नाही. नागरिकांनी मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या