शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:55 IST

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने फिरवली पाठ : प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी पोंभूर्णा तहसील कार्यालयासमोरही बेमुदत आंदोलन सुरू आहे.३० डिसेंबरपर्यंत कोतवालांना चतूर्थ श्रेणीत समाविष्ट करावे, अशी प्रमुख मागणी कोतवाल संघटनेने केली आहे. कोतवाल हा महसुल विभागाचा प्रमुख घटक अहे. मात्र अल्प मानधन दिल्या जाते. कमी मानधनात कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. कोतवालांना महसुल गोळा करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात सुचना देणे, नोटीस तामील करणे, कृषी गणना, संगणक सातबारा रेकार्ड तसेच निवडणुकीच्या काळात अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातात. कोतवालांना चतूर्थ श्रेणी मिळावी, यासाठी आंदोलने करून शासनाला वेळोवेळी निवेदन दिली. पण मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कोतवाल संघटनेने केला आहे. ३० डिसेंबरपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर राज्य संघटनेच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेने दिली.राजुऱ्यातही आंदोलनराजुरा : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका शाखेकडून राज्य कोतवाल संघटनाद्वार २१ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चा व उपोषण करून शासनाला निवेदन देण्यात आले. मागील ५० वर्षांपासून कोतवालांना न्याय मिळाला नाही. शासनाची विविध कामे करूनही त्यांची उपेक्षा केली जात आहे, असा आरोप संघटनेने केला. वारंवार पाठपुरावा करूनही उपेक्षा वाटल्याला येत असल्याने राज्य कोतवाल संघटनेच्या नेतृत्व बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसण्यात आले. कोतवालच्या वारसांना पेंशन लागू करण्यात यावे, लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण देण्याची मागणीही संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चेन्नूरवार, सचिव मारोती मेश्राम यांनी निवेदनात नमूद केली आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असल्याने तालुक्यातील अनेक कामांवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तलाठ्यांची महत्त्वपूर्ण कामे रखळली आहेत.