शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

कोठारीचे नागरिक पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:58 IST

येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही.

ठळक मुद्देनवीन योजनेला वीज पुरवठा करण्यास महावितरणचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही. थकित वीज देयके भरण्यास ग्रा.पं. तयार असतानाही वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित ठेवून गावकºयांना पाण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असून गावात तीव्र संताप पसरला आहे.वीज वितरण कंपनीचे कोठारी ग्रा.पं. पाणीपुरवठा योजनेचे तीन लक्ष देयक थकीत आहे. सन २००८ पासून वीज वितरण कंपनीच्या कोठारी येथील ३३ केव्ही. सब स्टेशन व कर्मचारी निवासस्थान वसाहत हजारो फूटात बसली आहे. यावर ग्रा.पं.ने सर्वसामान्य नागरिकांच्या घरासाठी आकारण्यात आलेल्या करापेक्षा कमी दराची आकारणी केली. मात्र गेल्या दहा वर्षांपासून वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे थकीत कराचा भरणा केलेला नाही. तेरा लक्ष रुपये महावितरणकडे थकीत आहेत. त्यासाठी ग्रा.पं.ने अनेकदा पत्रव्यवहार करुन थकीत कराचा भरणा करण्यासाठी विनंती केली. मात्र आकारणी दर जास्त असल्याचा कांगावा करुन थकीत कर भरण्यासाठी महावितणने असमर्थता दर्शविली आहे.कोठारी गावाची वाढती लोकसंख्येमुळे जुनी नळ योजना अपुरी पडत असल्याचा विचार करुन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी खनीज विकास निधीअंतर्गत विशेष बाब म्हणून ३ करोड ५० लक्ष रुपयाची वर्धा नदीवर नवीन नळ योजना मंजूर केली. नवीन नळयोजनेचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र वीज पुरवण्यासाठी प्रतीक्षा लागून आहे. त्यासाठी संबधीत विभागाने वीज कंपनीकडे पत्रव्यवहार करुन वीज पुरवठा करण्यासाठी सांगितले. मात्र वीज वितरण कंपनीने ग्रा.पं.कडे वीज देयक थकीत असून त्याचा भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा करण्यात येणार नसल्याचे ग्रा.पं.ला सांगितले. परंतु ग्रा.पं.चा वीज वितरण कंपनीकडे लाखो रुपये कर रुपात थकीत असून वीज कंपनीने थकिता देण्याची रक्कम कपात करावी व वीज पुरवठा करण्यास पत्र दिले.त्यामुळे वीज कंपनीचे अधिकारी व ग्रा.पं. कमिटीने संयुक्त बैठक घेवून तडजोड करीत तीन लक्ष ३५ हजार भरण्याचे ठरले असता पुन्हा वीज मंडळाने ५ लक्ष ८६ हजार रुपये भरण्याचे पत्र दिले आहे. वीज मंडळाच्या अशा दुटप्पी व अडेलतट्टू धोरणाने गावकरी संतापले असून वीज कंपनी केवळ स्वत:च्या फायद्यासाठी पाण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला असल्याचा सूर उमटत आहे.गावकºयांचा आंदोलनाचा इशारादहा वर्षांपासून कोठारीची जनता पाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहे. नवीन नळयोजना पूर्णत्वास आली, मात्र वीज पुरवठा महावितरण कंपनी करीत नसल्याने गावकºयांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा करुन गावकºयांना पाणी पुरवठा न केल्यास कोठारीचे नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रा.पं. उपसरपंच अमोल कातकर यांनी दिला आहे.