सार्वजनिक आरोग्य विभागाचे कामकाज अधिक सुलभ व सनियंत्रित करण्यासाठी, तसेच विविध योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती व तालुका स्तरावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कार्यालयीन कामकाजाकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या पत्रानुसार जिवतीचे कार्यालय तालुकास्तरावर असणे आवश्यक असताना इतरत्र ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता स्थानापन्न आहे. दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय जिवतीला हलविण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, गडचांदूर येथील कार्यालय कोरपना तालुका मुख्यालयी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेऊन व अनेकदा मागणी करूनही स्थानापन्न करण्याचे कुठलेही आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका मुख्यालयी आणण्याबाबत कोरपनावरच अन्याय का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
कोरपनात हवे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST