हा मार्ग कातलाबोडीसह बोरगाव, हातलोणी, तीर्थक्षेत्र घाटराई, आदी गावांना पुढे जोडला गेला आहे. तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, उपकोषागार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शासकीय गोदाम, शासकीय आदिवासीं मुलाचे वसतिगृह, वसंतराव नाईक महाविद्यालय येथे जाण्यासाठी याच प्रमुख मार्गाने जावे लागते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेलचेल असते; परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्याने सद्य:स्थितीत प्रवास करणे जिकिरीचे ठरते आहे. १९९८ ला या रस्त्याची निर्मिती करण्यात आली. आजवर रस्ता सुस्थितीत असल्याने तेव्हापासून या रस्त्यावर साधी डागडुजी करण्यात आली नाही; परंतु गेल्या एक वर्षापासून या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीकडे मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
कोरपना - कातलाबोडी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST