शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोलाम आदिवासींची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:14 IST

मानिकगड कंपनीने कोलाम आदिवासींची जमीन संपादीत केली. मात्र, मोबदला आणि पूनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. त्यामुळे कुसंबी येथील ३४ कोलाम आदिवासी कुटुंबीयांनी गुरुवारी तहसील कार्यालयास धडक दिली.

ठळक मुद्देमोबदल्यापासून वंचित : माणिकगड कंपनीकडून अन्याय

आॅनलाईन लोकमतजिवती : मानिकगड कंपनीने कोलाम आदिवासींची जमीन संपादीत केली. मात्र, मोबदला आणि पूनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. त्यामुळे कुसंबी येथील ३४ कोलाम आदिवासी कुटुंबीयांनी गुरुवारी तहसील कार्यालयास धडक दिली.माणिकगड डोंगर पायथ्याशी कुसंबी येथे ३४ कोलाम आदिवासींचे कुटुंब निवास करीत आहे. भूमी अभिलेख विभागाच्या नकाशावर या गावाची नोंदणी कायम आहे. गावातील आदिवासी निझाम राजवटीपासून वास्तव्यास होते. मात्र, तीन दशकापूवीं माणिकगड इंडस्टिजने आदिवासी जमीन भूसंपादन व पूर्नवसन कायद्याचे उल्लंघन करून गावातील ६३.६२ हेक्टर कृषक जमीन व गावठाण आबादी गौण चुनखडी उत्खननसाठी वापरणे सुरू केले. मात्र, जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही. पूर्नवसन करून नागरिकांना आर्थिक मो बदला दिला नाही. एकाही कोलाम आदिवासींना कंपनीने नोकरी दिली नाही. ३५ वर्षांपासून न्यायासाठी सघंर्ष सुरू आहे. अनेकदा चौकशीची मागणी केली. मात्र. जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. पेसा कायदा अस्तिवात असूनही कुसुंबी येथील कोलाम आदिवासी माणिकगडचे कंपनीचे बळी ठरल आहेत. सत्याग्रह संघटनचे आबीद अली यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. तहसीलदार गेडाम यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी मानखु येडमे, परशु आत्राम, भाऊराव किन्नाके, नगरसेवक अशपाक शेख, चंद्रभान तोडसे, संरपच उत्तम आत्राम, मारोती येडमे, शंकर आत्राम, मुत्ता सिडाम, सुमन आत्राम आदींसह बहुसंख्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.अन्यथा पुन्हा आंदोलनजिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला नाही तर १६ एप्रिलला सर्व प्रकल्पग्र्रस्त माणिकगड कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह धरणे आंदोलन करणार आहेत.