शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाखांचा कोल्हापुरी बंधारा सहा महिन्यांत वाहून गेला

By admin | Updated: January 19, 2017 00:48 IST

तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर सहा महिन्यापूर्वी विदर्भ राज्य सिंचन योजनेतून १८ लाख रूपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला.

लघु सिंचाई विभाग : संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीबी.यू. बोर्डेवार राजुरातालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर सहा महिन्यापूर्वी विदर्भ राज्य सिंचन योजनेतून १८ लाख रूपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र हा बंधारा पहिल्या पावसातच वाहून गेला. बंधाऱ्याचा एक पिल्लर वाहुन गेला असून बंधारा आता कुचकामी ठरला आहे. यात शासनाच्या निधीचा दुरूपयोग झाला असून बंधारा बांधकामाची चौकशी करून संबधीत उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.पाण्याचा साठा राहावा, शेतीला मुबलक पाणी मिळावे, या हेतुने बंधारा बांधण्यात आला. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लघुसिंचाई विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे १८ लाख रुपयांचा खर्च वाया गेला आहे. बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला पिचिंग केलेली नाही. त्यामुळे दोन्ही भागातून पाणी वाहत असते. बंधारा बांधताना अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. त्यामुळे पहिल्याच पावसात बंधारा वाहुन गेला आहे. अकरा पिल्लरचा हा कोल्हापुरी बंधारा पाहता पाहता अत्यंत दयनिय अवस्थेत असून पिल्लर सुद्धा एका लाईनमध्ये उभे नाही. या बंधाऱ्याचे बिल काढताना लघु सिंचाई विभागाचे अधिकारी डोळेझाक करून बिल काढल्यामुळे शासनाच्या शेतकऱ्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनेचा बट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात लघु सिंचाई विभागाने बांधलेल्या बंधाऱ्यांची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. निकृष्ठ बांधकामास प्रोत्साहन देणाऱ्या लघु सिंचाई विभागाच्या अभियंत्यावर आणि ज्यांनी निकृष्ठ काम केले त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.याबाबत प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी लघु सिंचाई विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनीवरू संपर्क साधला असता, ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने संपर्क होवू शकला नाही. निकृष्ठ व बोगस बंधारा बांधकामाची चौकशी केली जाईल. यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार. - अ‍ॅड. संजय धोटे, आमदार राजुरा.