शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील आझाद बाग समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: August 27, 2015 01:16 IST

शहरातील आझाद बागेची अतिशय दुरवस्था झाली असून त्यामुळे आरोग्य सुदृढ करण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

मनपाला निवेदन : नागरिकांचे आरोग्य धोक्यातचंद्रपूर : शहरातील आझाद बागेची अतिशय दुरवस्था झाली असून त्यामुळे आरोग्य सुदृढ करण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महासचिव तथा नगरसेवक प्रविण पडवेकर यांनी मंगळवारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार यांना निवेदन दिले आहे.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बागेत दररोज सकाळी शेकडो लोक फिरण्यासाठी येतात. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. बागेतील ट्रॅकवर सदैव पाणी साचलेले असते. त्यामुळे त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करत चालावे लागते. बागेतील लॉनची अतिशय दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह नाही. जागोजागी घाण साचलेली आहे. नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस नाहीत. लहानमुलांसाठी सुस्थितीत खेळण्याचे साहित्य नाही. अशा प्रकारच्या विविध समस्यांनी सध्या या बागेला विळखा घातला आहे. मात्र दुसरीकडे शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद बागेची अतिशय दुरावस्था झाली आहे. या समस्यांना तातडीने मार्गी न लावल्यास महानगरपालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा संपेस्तोवर उपोषणाला बसण्याचा इशारा प्रवीण पडवेकर यांनी निवेदनातून दिला आहे. (प्रतिनिधी)