शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख ६० हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी

By admin | Updated: April 22, 2016 02:50 IST

कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामात ४ लाख ६० हजार १०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. या खरीप

चंद्रपूर : कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामात ४ लाख ६० हजार १०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. या खरीप हंगामाचे नियोजन गांभीर्यपूर्वक करून शेतकऱ्यांना बियाणे व खतासाठी कोणत्याही अडचणी जाणार नाही, याची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, काळा बाजार रोखावा व सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी कृषी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे गुरूवारी खरीप हंगामाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ.शोभाताई फडणवीस, आ. नाना श्यामकुळे, आ. सुरेश धानोरकर, आ. संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व जि. प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर उपस्थित होते.या बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी संबंधी विविध योजना व खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. योजना राबवित असताना किंवा कामाचे नियोजन करीत असताना काही अडचण आल्यास ते लेखी स्वरुपात कळविण्याच्या सूचना पालकमंत्र्यानी यावेळी दिल्या. यावर्षी पाऊस चांगला असल्याचा अंदाज वर्तविला जात असून हा खरीप सुगीचा जाईल, असे नियोजन करावे असे त्यांनी सांगितले. शेतकरी स्वाभिमान वर्ष राबवित असताना शेतकऱ्याला दिलासा मिळेल, अशा प्रकारे खरीपाचे नियोजन असावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत कृषी विषयी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीचे संचालन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे यांनी केले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)मागेल त्याला विहिर द्या४पेरणीचे नियोजन, बँकनिहाय कर्ज वाटप, कर्ज पुर्नगठन, राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, प्रलंबित कृषी पंपाच्या जोडण्या, बियाणांची उपलब्धता, खते किटकनाशके आदी विषयाचा या बैठकीत पालकमंत्र्यानी आढावा घेतला. मागेल त्याला विहीर या अंतर्गत जिल्ह्यात ५ हजार विहिरीचा लक्षांक ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. २ हजार ६११ मेट्रीक टन खत उपलब्ध४जिल्ह्यास विविध पिकांकरिता एकूण ८६ हजार ३८२ क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. खरीप हंगामाकरिता १ लाख १३ हजार ९०० मेट्रीक टन रासायनिक खताचे आंवटन असून २६११ मेट्रीक टन खत प्राप्त झाले आहे. यातून २०० मेट्रीक टन खताची विक्री झालेली आहे. तर २४११ मेट्रीक टन रासायनिक खत शिल्लक आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. असे आहे खरीपपेरणीचे नियोजन४सन २०१६-१७ मध्ये खरीप हंगामाकरिता ४ लाख ६० हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात १ लाख ७२ हजार, सोयाबिन ८० हजार हेक्टर असे नियोजन आहे.