शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वंचित समाजघटकांना ‘खाकी’ ने दिला मायेचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:25 IST

गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याशिवाय पोलीस काही करत नाही, असा समज आजही आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनातील काही घटक कारणीभूत असू शकतात.

ठळक मुद्देसफाई कामगार भारावले : भेटवस्तू देऊन सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर: गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याशिवाय पोलीस काही करत नाही, असा समज आजही आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनातील काही घटक कारणीभूत असू शकतात. मात्र, खाकी वर्दीतही संवेदना आणि सामाजिक बांधिलकी जोपासू शकतात, हे चिमूर पोलिसांनी सिद्ध केले. ठाणेदार दिनेश लबडे यांच्या पुढाकारात स्वच्छता कामगारांच्या कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबून त्यांना मायेचा हात दिला आहे.पोलिसांना दया-माया नसते. गुन्हेगारांचा कर्दनकाळ हीच प्रतिमा समाजासमोर आहे. मात्र खाकी वर्दीतही संवेदनशील माणूस दडलेला असतो. याची प्रचिती शहरातील पोलीस ठाण्यात आली. सर्व सामान्य नागरिकांत पोलिंसाप्रती आजही नकारात्मक दृष्टी आहे. ही प्रतिमा बदलविण्यासाठी ठाणेदार दिनेश लबडे यांनी शहरातील स्वच्छता कामगारांच्या कुटुंंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. कारण या कामगारांच्या कार्यामुळेच शहर निरोगी राहते. त्यामुळे या वंचित बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यातील न्युनगंड दूर करण्यासाठी दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. स्वच्छता कर्मवारी समाजासाठी महत्वाचे कार्य करतात. त्यांच्या या कार्याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली. आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून ठाणेदार दिनेश लबडे यांनी पोलीस ठाण्यात समाजातील स्वच्छतेचे काम करणाºया सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त या कामगारांना टॉवेल व मिठाई भेट देवून दिवाळी वंचित घटकांचा सत्कार केला. कायदा व सुव्यवस्थेचे काम पाहत असताना हा नाविण्यपूर्व उपक्रम राबविल्याने शहरातील नागरिकांनी कौतुक केले. नगरसेवक उमेश हिंगे, पत्रकार रामदास हेमके, फिरोज पठाण, नागेश चट्टे, सुधाकर माकोडे, वासु टेकाम, सुधाकर घाटे, दगडू आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रत्येक उत्सवामध्ये पोलीस शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी कर्तव्य बजावतात. त्यामुळे बरेच सण परिवारासोबत साजरा करता येत नाही. कायदा व सुव्यस्था सांभाळताना आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेनेतून सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम आम्ही राबविला.- दिनेश लबडे, ठाणेदार