शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मूल शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे

By admin | Updated: August 7, 2014 23:53 IST

मूल शहरातून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची पावसाळ्याच्या दिवसात अतिशय दुरवस्था झाली असून सतत वर्दळ असलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता पार करताना

मूल : मूल शहरातून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची पावसाळ्याच्या दिवसात अतिशय दुरवस्था झाली असून सतत वर्दळ असलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता पार करताना नागरिकांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता मूल शहरातील असला तरी ग्रामीण भागाला जोडणारा असल्याने नागरिकांची रस्त्यावर मोठी वर्र्दळ असते.हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अख्त्यारित येतो. असल्याने नगर परिषद प्रशासन व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एकमेंकाकडे बोट दाखवून वेळ मारुन नेत असल्याचे दिसून येते. मात्र सदर मार्गावरुन मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.मूल-नागपूर महामार्गावरुन श्रीराम टॉकीज ते ताडाळा रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन चालताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. विसर्जनाच्या वेळी रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक आहे. दरवर्षी नगर परिषद या मार्गावर मुरुम टाकून डागडुजी करून तात्पुरती सोय करते. मात्र यावर्षी नगर परिषदेने याविषयातून अंग काढून घेतल्याने या रस्त्याची डागडुजी होईल की, नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी नगर परिषद रस्त्याच्या डागडुजीसाठी अनुदान मंजूर करते. त्याद्वारे सर्व वॉर्डात मुरुम टाकला जातो. मात्र मुरुम मंजूर होईपर्यंत पावसाळा निघून जातो, असा अनुभव आहे.( तालुका प्रतिनिधी)