शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केरोसीनचा पुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

चंद्रपूर : दारिद्र्यरेषेखालील जनतेचे जीवनमान सुधारावे, या उद्देशाने शासनातर्फे विविध योजना सुरू केल्या. मात्र, यातील अनेक योजना बंद करण्यात ...

चंद्रपूर : दारिद्र्यरेषेखालील जनतेचे जीवनमान सुधारावे, या उद्देशाने शासनातर्फे विविध योजना सुरू केल्या. मात्र, यातील अनेक योजना बंद करण्यात आल्या आहे. त्यातच उज्ज्वला योजनेमुळे शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसीन बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडणीत वाढ झाली आहे.

देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरून महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करून घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला; पण यामुळे केरोसीनवर बंदी घालण्यात आली. गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असल्याने शेवटी गरीब जनता सरपण गोळा करून स्वयंपाक शिजवत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सरपण पेटविण्यासाठी केरोसीनची आवश्यकता आहे. केरोसीन मिळविण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पूर्वी शेतकरी शेतात जागल करण्यासाठी केरोसीनचा दिवा, कंदिलाचा वापर करीत होते. मात्र, केरोसीन बंदीमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या थोडी हवा जरी आली तरी महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा बंद केला जातो. त्यामुळे खेड्यातील जनतेला वीज येईपर्यंत अंधाराचा सामना करावा लागत आहे. केरोसीन बंदीमुळे दिवा, कंदिलाचा उपयोग होताना दिसत नाही. सामान्य कुटुंबातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे.