शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

केरला एक्स्प्रेसचा चंद्रपुरात थांबा मंजूर

By admin | Updated: November 20, 2015 00:27 IST

जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे बहुप्रतीक्षित स्वप्न केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून साकार झाले आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे बहुप्रतीक्षित स्वप्न केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून साकार झाले आहे. त्रिवेंद्रम- नवी दिल्ली- केरला या दैनिक गाडीचा थांबा चंद्रपूर रेल्वेस्थानकावर मंजूर करण्यात ना. अहीर यांना यश आले आहे. २३ नोव्हेंबरपासून ही रेल्वेगाडी चंद्रपूर स्थानकावर थांबणार आहे. या एक्स्प्रेसचा लाभ जिल्ह्यातील हजारो प्रवासी होणार असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मागील काही वर्षांपासून केरला एक्स्प्रेसचा चंद्रपूर रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समिती, कोयला, श्रमिक संघ तसेच विविध सामाजिक, व्यावसायिक, औद्योगिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे करण्यात येत होती. या मागणीस अनुसरुन त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. १८ मार्च २०१५ रोजी ना. अहीर यांच्या नेतृत्वात या मागणीला घेऊन चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ना. अहीर यांनी केरला एक्स्प्रेसचा थांबा या औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या जिल्ह्याकरिता किती महत्वपूर्ण आहे, ही बाब पटवून दिली होती. या भेटीत मंत्र्यांनी या गाडीचा थांबा देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर लगेच चंद्रपुरात थांबा मंजूर केल्याचे पत्रही राज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिले.२३ नोव्हेंबर रोजी केरला एक्स्प्रेस (१२६२५/ १२६२६) पहिल्यांदा चंद्रपूर रेल्वेस्थानकावर थांबणार असून या थांब्यामुळे जिल्ह्यातील सर्वच घटकातील प्रवाशांना मोठी सुविधा ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाली आहे. या गाडीमुळे आता तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांना थेट सुविधा उपलब्ध होणार आहे. वर्धेहून पुण्याला जाण्याकरिता गरीब रथ तसेच पुणा एक्स्प्रेस पकडण्याची तसेच या एक्स्प्रेसने नागपूरला जाऊन मुंबईकरिता दुरांतो एक्स्प्रेस पकडण्याची सोय होणार आहे. केरला एक्स्प्रेस ही चंद्रपूर रेल्वेस्थानकावर सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास पोहोचणार असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)