शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक बदलांची शास्त्रीय माहिती ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:38 IST

किशोरी व युवतींनी आपल्या शारीरिक बदलांची शास्त्रीय कोणतेही गैरसमज न ठेवता जाणून घेतली पाहिजे, असे मत अ‍ॅड. वर्षा जामदार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवर्षा जामदार : दृष्टी संस्थेतर्फे ‘बेटी करे सवाल‘ कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : किशोरी व युवतींनी आपल्या शारीरिक बदलांची शास्त्रीय कोणतेही गैरसमज न ठेवता जाणून घेतली पाहिजे, असे मत अ‍ॅड. वर्षा जामदार यांनी व्यक्त केले. भवानजीभाई शाळेत दृष्टी सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे ‘बेटी करे सवाल’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महेशकर व मंचावर किरण बल्की, रोहिणी साखरकर, उषा मसादे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. जामदार म्हणाल्या, आरोग्य शास्त्राची माहिती घेवून निरोगी जीवन जगले पाहिजे. ज्ञान व विज्ञानामुळे नवे शोध लागले. त्यामुळे चुकीच्या पंरपरा टाळले पाहिजे. मुलींमध्ये शारीरिक बदलांसोबत मानसिक व भावनिक बदल होतात. या वयात चुका होण्याचा धोका असतो. किशोरी मुली व युवतींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होता. या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी दृष्टी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने १० वर्षांपासून जागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती उपाध्यक्षा अ‍ॅड. विद्या मसादे यांनी दिली. मुलींनी मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छता आणि आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत सारिका बोराडे यांनी व्यक्त केले. शारीरिक बदलांविषयी प्रत्येक किशोरीने एकमेककांशी चर्चा केली पाहिजे. शिवाय, पौष्टीक आहार घ्यावा. कार्यशाळेत किरण बल्की, रोहिणी साखरकर, उषा मसादे यांनी विविध खेळांच्या माध्यमातून सामाजिक विषयांची अतिशय सोप्या भाषेत मांडणी केली. शाळेतील विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून शरीरातील बदलांची माहिती जाणून घेतली. प्रास्ताविक निमा लोहे यांनी संचालनशिक्षिका सहारकर यांनी केले. कहाडींगे यांनी आभार मानले केले. कार्यशाळेची सुरूवात स्वागत गीताने झाली.