शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

कार्तिकी जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: June 4, 2017 00:24 IST

सीबीएसई बोर्डाच्या शनिवारी आॅनलाईन घोषित झालेल्या दहावीच्या निकालात महर्षी विद्यामंदिर येथील विद्यार्थिनी कार्तिकी देगमवार जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.

सीबीएसई दहावीचा निकाल : गुणांची टक्केवारी वाढलीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सीबीएसई बोर्डाच्या शनिवारी आॅनलाईन घोषित झालेल्या दहावीच्या निकालात महर्षी विद्यामंदिर येथील विद्यार्थिनी कार्तिकी देगमवार जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. तिने ९९.४ टक्के गुण घेत प्रथम येण्याचा मान मिळविला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी सीबीएसई निकालात गुणांची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम असलेल्या जिल्ह्यात जवळपास १२० शाळा आहेत. चंद्रपूर शहरात आठ ते दहा शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवितात. सीबीएसईचा दहावीचा निकाल आज शनिवारी आॅनलाईन घोषित करण्यात आला आणि या शाळांमध्ये सुट्या सुरू असतानाही आज विद्यार्थ्यांची रेलचेल दिसून आली. येथील महर्षी विद्या मंदिर येथील विद्यार्थिनी कार्तिकी देगमवार हिने ९९.४ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिली येण्याचा मान मिळविला.जिल्ह्यातील सर्वच शाळांनी दिला उत्कृष्ट निकालनिकाल दहावीचा : बहुतांश विद्यार्थ्यांनी केले ९० टक्के पारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच शाळांनी यंदा सीबीएसई दहावीचा निकाल उत्कृष्ट दिला आहे. जिल्ह्यात पहिली आलेली कार्तिकी देगमवार हिने गणित व विज्ञान या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे. चंद्रपूरच्याच बीजेएम कार्मेल अकादमीची विद्यार्थिनी ईशा राजू घुमे, नारायणा विद्यालयाची मानसी भलमे आणि प्रतिक इंगळे यांना ९९.२ गुण मिळाले आहेत. महर्षी विद्यामंदिरमधील २० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकाविले आहेत. त्यापैकी ११ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. तर बीजेएम कार्मेल अकादमीच्या चार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. नारायणा विद्यालयाच्या ५३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकाविले आहेत. येथील नारायणा विद्यालयमनेही १०० टक्के निकाल दिला आहे. येथील ४६ विद्यार्थी १० सीजीपीएमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर ५३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण घेऊन यश प्राप्त केले आहे. चंद्रपुरातील विद्या निकेतन शाळेतील १४ विद्यार्थी १० सीजीपीए मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यात ११ विद्यार्थिनींचा समावेश आहे. मॅकरून स्टुडंट अ‍ॅकाडमी या विद्यालयातील ६२ विद्यार्थी सीजीपीए-१० मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. ब्रह्मपुरी येथील विद्या निकेतन शाळेतील सहा विद्यार्थी ९० टक्क्याहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलमधील दहा विद्यार्थी १० सीजीपीए प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहे. एकूणच दहावी सीबीएसई निकालात यंदा गुणांची टक्केवारी मागील वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले.कार्तिकीला व्हायचय आर्किटेक्चरशनिवारला घोषित झालेल्या सीबीएसीच्या निकालात विदर्भातून प्रथम आलेल्या कार्तिकीला आर्किटेक्चर व्हायचे आहे. कार्तिकीचे वडिल प्रविण देगमवार हे सिव्हिल इंजिनियर आहेत. तर आई योगिनी देगमवार या प्राध्यापिका आहेत. कार्तिकीला अभ्यासामध्ये तिचे वडील मदत करायचे. कार्तिकी नियमीत ५ ते ६ तास अभ्यास करायची तर परीक्षेच्या कालावधीत ८ ते ९ तास अभ्यास करीत होती. कार्तिकीने अभ्यास करताना पेपर सोडविण्यावर अधिक भर दिला. त्यासोबतच स्वाध्याय पुस्तिकाचे नियमीत वाचन केले. कार्तिकीला पेंटींग, नृत्य करणे, गाणे गाण्याचा छंद आहे. तसेच कार्तिकीला क्रिकेटची आवड असून तिचा आवडता खेळाडू विराट कोहली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आवडते राजकीय नेते आहेत. कार्तिकीला शिक्षकांच्या मार्गदर्शनात नियमीत अभ्यास केल्याने यश प्राप्त झाले.