शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काजलचा मृतदेहही नीट पाहू दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:35 IST

पोलीस काजलने आत्महत्याच केली म्हणत आहे. पण तिने आत्महत्या केली नाही. तिची हत्याच करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगंभीर आरोप : पोलीस प्रकरण दडपण्याच्या मन:स्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : पोलीस काजलने आत्महत्याच केली म्हणत आहे. पण तिने आत्महत्या केली नाही. तिची हत्याच करण्यात आली आहे. मात्र पोलीस आत्महत्येचा बनाव करून प्रकरण दडपण्याच्या मनस्थितीत दिसत असल्याचा गंभीर आरोप मृत काजलचे मोठे वडील काशीनाथ हनवते यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.‘लोकमत’ने काजलचे मृत्यू प्रकरण उचलून धरल्यामुळे आम्हाला यामध्ये न्याय मिळण्याची आशा कायम आहे, असेही ते म्हणाले.काजलचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे माहिती होताच तिथे गेलो. काजलच्या एका नाकातून रक्त निघत होते आणि दुसºया नाकातून पाण्याचे बुडबुडे निघत होेते. तिचा मृतदेह काहीच वेळापूर्वीचा होता.पोलिसांनी मृतदेह विहिरीतून काढला व लगेच चादरीमध्ये गुंडाळून रुग्णालयात नेला. तो कुणालाही पाहू दिला नाही. घटनास्थळाचा पंचनामाही थातूरमातूर करून आत्महत्याच असल्याचा सूर आवळणे सुरू केले. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.पोलिसांकडून अपेक्षा संपलीपोलीस तपास करण्याच्या मन:स्थितीत नाही. शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे हे सिंदेवाहीला येणार आहे. असे सांगून पोलीस ठाण्यात बोलाविले. मात्र तेथे गेलो असता ते निघून गेल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना तपास करायचा नसेल, तर आमच्याकडून तपास करू नका असे लिहून द्यावे, असे खुद्द ठाणेदाराला म्हटले, अशी हतबलताही काशीनाथ हनवते यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.