शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कडकडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:00 IST

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुकारलेल्या विदर्भ बंदला चंद्रपुरात अल्प प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देविदर्भ राज्य करा : चंद्रपुरात बंदला अल्प प्रतिसाद

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुकारलेल्या विदर्भ बंदला चंद्रपुरात अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.चंद्रपुरात आज सकाळपासूनच बंदला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास विदर्भवाद्यांनी शहरात रस्त्यांवर फिरून व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गावरील काही दुकाने त्यानंतर बंद करण्यात आली. मात्र याची भनक पोलिसांना लागताच पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. रामनगर, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, गिरनार चौक, गांधी चौक या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विदर्भवादी कार्यकर्ते येताच त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जात होते.वरोºयात विदर्भवाद्यांनी सकाळपासूनच रॅली काढून बंदचे आवाहन केले. त्यानंतर शहरातील शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती कोअर कमिटीचे सदस्य अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, निखील मत्ते, समीर बारई, जयंत टेमुर्डे, अ‍ॅड. शरद कारेकार आदी सहभागी झाले होते.राजुºयात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शेतकरी संघटनेचे प्रा. अनिल ठाकुरवार, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, नगरसेवक भाऊजी कन्नाके, मधुकर चिंचोळकर, घनश्याम हिंगाने, राजु धोटे, अ‍ॅड. अरुण धोटे, प्रशांत माणुसमारे, असद कुरेशी, दिनकर डोहे, सुनिल सोमलकर आदींनी व्यवसायिकांना बंद पाळण्याची विनंती केली.मूलमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष कवडू येनप्रडीवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, पंचायत समितीचे माजी सभापती व सदस्य संजय पाटील मारकवार, बाजार समितीचे संचालक राकेश रत्नावार, गंगाधर कुनघाडकर, संदीप कारमवार आंदोलनात सहभागी झाले होते.ब्रह्मपुरी येथे कडकडीत बंद पाडून शिवाजी चौक येथे डॉ. डी. एन. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली. यात अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, हरिश्चंद्र चोले, सुखदेव प्रधान, अ‍ॅड. हेमंत उरकुडे, विनायक रामटेके, सुधा राऊत यांनी मार्गदर्शन केले.जीवतीसह संपुर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाडण्यात आला. या आंदोलनाला भाजपा सोडून सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग दर्शविला.पोंभूर्णा येथे कडकडीत बंद पाडून तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात आंदोलन समितीचे गिरीधर बैस, मुरलीधर टेकाम, अशोक सिडाम, विराज मुरकुटे आदींचा समावेश होता. यासोबतच सिंदेवाही, नागभीड, चिमूर, बल्लारपूर, गोंडपिंपरी या तालुक्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.भद्रावतीत उत्स्फूर्त प्रतिसादभद्रावती येथील व्यापारी बांधवांनी तथा शैक्षणिक संस्थांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंस्फुर्तीने दुकाने व शाळा -महाविद्यालय बंद ठेवले. विदर्भवाद्यांनी ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर निनादून सोडला. आंदोलनकर्त्यांमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रा. विवेक सरपटवार, सचिव राजू बोरकर, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, चंद्रकांत गुंडावार, प्रशांत कारेकर, संतोष रामटेके आदींचा समावेश होता.नांदाफाटा येथे तणावकोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे विदर्भवादी कार्यकर्त्यांनी बंददरम्यान रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. १० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.