शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
2
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
3
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
4
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
5
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
6
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
7
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
8
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
9
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
10
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
11
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
12
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
13
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
14
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
15
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
16
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
17
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
18
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
19
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
20
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

कबड्डी खेळाडूंना सहकार्य करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:10 IST

कबड्डी महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे. आजही ग्रामीण भागात कबड्डी मोठ्या प्रमाणात खेळली जाते. ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंनी भारतीय संघात प्रतिनिधित्व करावे.

ठळक मुद्देएकनाथ शिंदे : विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

आॅनलाईन लोकमतवरोरा : कबड्डी महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे. आजही ग्रामीण भागात कबड्डी मोठ्या प्रमाणात खेळली जाते. ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंनी भारतीय संघात प्रतिनिधित्व करावे. राज्य सरकार या कबड्डी खेळाडूंना सहकार्य करणार, अशी ग्वाही राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली़ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़वरोरा शहरात स्व. प्रा. उत्तम मेश्राम स्टेडीयम कॉटन मार्केटमध्ये स्व. सुनील धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयहिंद क्रीडा व्यायाम प्रसारक मंडळ आणि आमदार बाळू धानोरकर यांच्या पुढाकाराने विदर्भस्तरीय पुरुष व महिलांच्या कबड्डी स्पर्धा सुरू आहे़उद्घाटन सोहळ्याला राजापुरा येथील आमदार राजन साळवी, आळंदीचे आमदार सुरेश गोरे, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, युवा सेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, महिला आघाडी संघटीका रोगे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सोहेल, वाहतूक जिल्हा प्रमुख प्रमोद मगरे, वणीचे संजय देरकर, सुनील कातखेडे, वरोरा बाजार समिती सभापती विशाल बदखल, उपसभापती राजू चिकटे, न.प. गटनेता गजानन मेश्राम,नगरसेवक राजू महाराज आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते़ना़ शिंदे म्हणाले, राज्याने क्रीडा धोरण केले असून, ग्रामीण खेळाडूंना चालना देण्यासाठी विविध योजना सुरू आहेत़ अन्य खेळांप्रमाणेच कबड्डीला आज प्रतिष्ठा मिळाली़ या खेळासाठी क्रीडा संघटनांनी सहकार्य करावे़ स्वच्छ भारत अभियानात भद्रावती नगरपालिकेने देशात दुसरा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल नगराध्यक्ष धानोरकर व उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांचा ना. शिंदे यांनी सत्कार केला़विदर्भात खेळाडू दाखलवरोरा येथे सुरू झालेल्या विदर्भस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भातील नामांकित खेळाडू शहरात दाखल झाले आहेत़ युवक, युवती, महिला व प्रौढांकरीता क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याची परंपरा कायम असून, या स्पर्धेच्या निमित्ताने शहरात क्रीडाप्रेमींमध्ये आनंद संचारला आहे़ उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन आरती रोडे यांनी केले़ वैदही खडसान यांनी गायलेल्या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले़ प्रास्ताविक भाषधातून आमदार बाळू धानोरकर विविध उपक्रमांची माहिती दिली़ डॉ. सागर वझे यांनी आभार मानले. चार दिवस चालणाºया स्पर्धेत विदर्भातील पुरुषांचे ३५ आणि महिलांचे २० संघ सहभागी झाले आहेत. या संघामध्ये प्रो. कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेले प्रसिद्ध खेळाडू शशांक वानखेडे, शुभम पालकर, सारंग देशमुख आदींचाही समावेश आहे़ या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण भागातील क्रीडापे्रमी युवक गर्दी करीत आहेत़