शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाआॅनलाईनकडून डाटा एंट्री आॅपरेटरची थट्टा

By admin | Updated: May 11, 2014 00:12 IST

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची माहिती शासनाला त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी मागील काही वर्षांपासून महाआॅनलाईन कंपनीने प्रत्येक तालुक्यात

 चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची माहिती शासनाला त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी मागील काही वर्षांपासून महाआॅनलाईन कंपनीने प्रत्येक तालुक्यात डाटा एंट्री आॅपरेटरची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांच्यामार्फत प्रत्येक ग्रामपंचायत संगणकीकृत केली जात आहे. मागील काही दिवसांपासून १९६९ पासूनची जन्म-मृत्यूची नोंदणीही आता डाटा एंट्री आॅपरेटरमार्फत करून घेण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक आॅपरेटरला दिवसाला १०० एंट्री करण्याचे आदेश पंचायत समितीकडून दिले आहे. त्यामुळेच अनेक आॅपरेटरला न्याहारीवरच अख्खी रात्र पंचायत समितीमध्ये काढावी लागत आहे. डाटा एंट्री आॅपरेटरवर होणारा अन्याय दूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिला आहे. महाआॅनलाईन कंंपनीने संग्राम सॉफ्टमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत संगणीकृत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी महाआॅनलाईनवर कंपनीने प्रत्येक तालुक्यात डाटा एंट्री आॅपरेटरची नियुक्ती केलेली आहे. मूल तालुक्यात ४८ ग्रामपंचायतीसाठी सुमारे ४३ डाटा एंट्री आॅपरेटरची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांच्यामार्फत दाखले देण्याचे काम सुरू आहे. २८ एप्रिलपासून प्रत्येक ग्रामपंचायतीमधील संगणक आता पंचायत समितीच्या सभागृहात आणून ठेवलेले आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे डाटा एंट्री आॅपरेटरला आता पंचायत समितीमध्ये बोलावून त्यांच्याकडून सन १९६९ पासूनच्या जन्म मृत्यूच्या नोंदी संगणकावर एंट्री करण्याचे काम सोपविण्यात आलेले आहे. दिवसातून किमान १०० एंट्री करणे प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आलेले असल्यामुळे काही आॅपरेटरला नोंदणी करण्यासाठी उशीर होत आहे. अशावेळी केवळ नास्त्यावरच रात्र पंचायत समितीमध्येच काढावी लागत आहे. ही बाब श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी माहीत होताच त्यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन आॅपरेटरची भेट घेतली. तेव्हा हे भीषण वास्तव्य समोर आलेले आहे. सदर आॅपरेटर हे सुमारे २० ते २५ किमी अंतरावरुन पंचायत समितीमध्ये एंट्री करण्यासाठी येतात. त्यांना पंचायत समितीकडून ना प्रवास भत्ता दिला जातो, ना भोजनाची व्यवस्था केली आहे. प्रत्येकांना स्वत: हा खर्च करावा लागत आहे. केवळ ३८०० रुपये मानधन घेऊन हे डाटा एंट्री आॅपरेटर काम करीत आहे. (शहर प्रतिनिधी)