शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राजकीय द्वेशातून दोन गटात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

विजय बावणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद सत्तार खान पठाण, आबिद अली, नगर पंचायत सदस्य सोहेल अली, शारीक मोसीम अली, नगर सेवक अमोल आसेकर, अरविंद डोहे, नितीन भास्कर मुसळे, शाहेबाज आसीब अली, अमोल सुर्यभान टोंगे, प्रमोद सत्यवान घोटेकर व अतुल आसेकर यांचेवर भादंविच्या कलाम १४७, १४८, १४९, ५०७, ४५२, ५०६, ३२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरपन्यात राजकारण तापले : दोन्ही गटाकडील एकूण १७ जणांवर गुन्हे दाखल

  लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : येत्या काही दिवसात कोरपना नगरपंचायतीची निवडणूक असून आतापासूनच राजकीय वातावरण तापले आहे.  नगरसेवक विजय बावणे व कुटंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी ११ जणांविरुध्द तर मोहम्मद सत्तार खान यांच्या तक्रारीवरून बावणेसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटांच्या क्षुल्लक भांडणात एकूण १७ लोकांवर गुन्हे दाखल झाल्याने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.येथील मोहम्मद सत्तार खान पठाण यांनी नगरपंचायतीबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने नगरसेवक विजय बावणे व मोहम्मद सत्तार खान पठाण यांच्यात फोनवर वादावादी झाली. विजय बावणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद सत्तार खान पठाण, आबिद अली, नगर पंचायत सदस्य सोहेल अली, शारीक मोसीम अली, नगर सेवक अमोल आसेकर, अरविंद डोहे, नितीन भास्कर मुसळे, शाहेबाज आसीब अली, अमोल सुर्यभान टोंगे, प्रमोद सत्यवान घोटेकर व अतुल आसेकर यांचेवर भादंविच्या कलाम १४७, १४८, १४९, ५०७, ४५२, ५०६, ३२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी साथीदारासहकोरपना नगरपंचायतीच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नंदा बावणे यांच्या घरात घुसून त्यांचा मुलगा नितीन बावणे यांना रस्त्यावर ओढत नेले. नंदा बावणे, सुनील बावणे व विजय बावणे बचावाकरिता गेले असता आरोपींनी लाठयाकाठयांनी सर्वांना मारहाण केल्याची फिर्याद नंदा बावणे यांनी कोरपना पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून कोरपना पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

बावणे कुटुंबीयांकडूनही धमकीमोहम्मद सत्तार खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदस्य विजय बावणे, नितीन बावणे, सुनील बावणे, नगरपंचायतचे उपाध्यक्ष मनोहर चन्ने, स्वप्नील गाभणे, पियुष कावळे इत्यादीं विरुद्ध मोहमद सत्तार खान पठाण यांना फोनवरून मारपीट करण्याची धमकी देऊन आपल्या समर्थकांसह पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ५०६, ५०७, २९४, ३३२ व ४५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  एकंदरीत कोरपना नगरपंचायतीची निवडणूक समोर असल्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरू झाले आहे. यामुळे कोरपना शहरामध्ये वातावरण तापले आहे.कोरपना येथील व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे दोन्ही गटात वाद झाला. त्यामुळे दोन्ही गटाने एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या. दोन्ही गटाकडील  तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.-अरुण गुरनुले , ठाणेदार, कोरपना

टॅग्स :Politicsराजकारण