शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती परिसरात नकली दारु विक्रीचा व्यवसाय जोमात

By admin | Updated: February 4, 2017 00:42 IST

समाजहित व तळीरामांचे आरोग्य लक्षात घेत एकीकडे महाराष्ट्र शासनाने आपला राजस्व बुडवून जिल्ह्यात दारुबंदी केली असली तरी ...

दोन प्रकारची दारूविक्री : मद्यपी करताहेत दामदुपटीने खरेदी आयुध निर्माणी (भद्रावती) : समाजहित व तळीरामांचे आरोग्य लक्षात घेत एकीकडे महाराष्ट्र शासनाने आपला राजस्व बुडवून जिल्ह्यात दारुबंदी केली असली तरी दुसरीकडे या दारुबंदी झालेल्या भद्रावती परिसरात नकली दारुचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मद्यपींचे जीवन धोक्यात आले आहे. या अवैध नकली दारु पुरवठ्यामुळे शासनाचा उदात्त हेतू मागे पडत असल्याने या नकली अवैध दारुवर प्रतिबंध लावण्याची मागणी होत आहे.दारुबंदीपूर्वी बारमध्ये जाऊन दारु घेतली जायची. परंतु बंदीनंतर पाहिजे तिथे व पाहिजे तेवढी दारु मिळत आहे. भद्रावती परिसरात विकल्या जाणारी दारु नकली स्वरुपात असल्याची चर्चा आहे. अवैधपणे दारु विकत घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. असली इंग्रजी दारु समजून खरेदी करताहेत करण्यात येणारी दारू इंग्रजी दारुच्या बाटलीमध्ये नकली दारु भरण्यात येत आहे. ती असली असल्याचे भासवले जात आहे. या परिसरात दोन प्रकारची दारु मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याचे कळते. एक एम.डी. नंबर वन आणि ओ.सी. डब्ल्यू. या सर्व दारु ओरीजनल बॉटलमध्ये डुप्लिकेत असल्याचे कळते. दारु नकली की, असली आहे, हे ओळखण्याचे मद्यपींकडे कुठलेही विश्वासू तंत्र नाही. ते केवळ आपला शौक पूर्ण करण्याकरिता लपूनछपून दारु खरेदी करतात. ही दुय्यम प्रतीची दारु पिणाऱ्यांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. नकली इंग्रजी दारु पिणाऱ्यांना पोटाचे आजार व छातीत जळजळ करीत असते. त्यांना मोठ्या प्रमाणात आजार जडल्याची चर्चा आहे. शासनाने दारुबंदी घोषित करून आपले कर्तव्य तर पार पाडले. पण त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी करणारी यंत्रणा व कमजोर इच्छाशक्ती यामुळे तळीराम नकली दारुवर ताव मारीत नशेचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)दारु पिल्यामुळे पोटाचे आतडे, लिव्हर व स्वादुपिंडाचे आजार होतात. परंतु पूर्वी २० -२५ वर्षी अतिरेकी प्रमाणात दारु प्राशन केल्यावर तळीरामांच्या आरोग्यावर जे विपरित परिणाम व्हायचे. तेवढे परिणाम दारुबंदीनंतर दीड-दोन वर्षात दिसायला लागले ़आहेत.-डॉ. विवेक शिंदे,भद्रावती