शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जुगनाळा ग्रा.पं.ला जिल्ह्यातून प्रथम आदर्श ग्राम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:11 IST

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत घेण्यात आलेल्या आदर्श ग्राम व आदर्श ग्रामसेवक स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामचा प्रथम पुरस्कार बहाल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत घेण्यात आलेल्या आदर्श ग्राम व आदर्श ग्रामसेवक स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामचा प्रथम पुरस्कार बहाल करण्यात आला.गुरुवारी पोंभूर्णा येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषविले.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आ. नाना शामकुळे, आ. सुरेश धानोरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे , सभापती ब्रिजभूषण पाझारे, संतोष तगडपल्लीवार, अर्चना जीवतोडे, गोदावरी केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदर्श गावे तयार करण्यासाठी केवळ योजना व निधीच लागत नाही तर माझ्या गावाचे नंदनवन मीच करणार, असा दृढनिश्चय लागतो. पालकमंत्री म्हणून अशा दृढनिश्चयी सरपंचाच्या मागे ताकदीने उभा आहे. प्रत्येक सरपंचाने आपल्या अधिकाराची किमान जाणीव ठेवावी, सरपंच रडणारा नव्हे गावासाठी लढणारा असावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी ना. हंसराज अहीर म्हणाले, शेतकरी शेतमजूर व गरीब जनतेला केंद्रस्थानी ठेवून राज्य व केंद्र शासनाने अनेक योजना तयार केल्या आहेत. या योजनांचा योग्य पद्धतीने उपयोग गावाच्या कल्याणाकरिता करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना केले. गावाच्या विकासासाठी विशेष चुणूक दाखवणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांचा यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आदर्श ग्राम म्हणून जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार जुगनाळा ग्रामपंचायतीला देण्यात आला. जुगनाळाचे सरपंच गोपाल ठाकरे, ग्रामसेवक शमा नान्होरीकर, उपसरपंच प्रमोद धोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत