वाहकांचेही दुर्लक्ष : एसटी महामंडळ नियंत्रणहीनगोंडपिंपरी : देशात सर्वदूर कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवून निरक्षरतेचे प्रमाण नाहीसे करण्यासाठी, शासनाने शर्तीचे प्रयत्न चालविले आहे. मुलींना शिक्षणाच्या सोयी सुलभतेने उपलब्ध व्हावेत, यासाठी मोफत एस.टी. पास योजनेसह शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत प्रवास एस.टी.ची ही व्यवस्था केली आहे. मात्र चालविण्यात येणाऱ्या हक्काच्या एसटीत विद्यार्थिनींना उभ्याने प्रवास करावा लागत असल्याचा प्रकार दिसत आहे.शासनाने मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत मोफत एस.टी. प्रवास योजना सुरू केली. ही योजना खास विद्यार्थिनींसाठी अमलात आणली. तर एस.टी. बस सांभाळ वेळापत्रक तथा चालविण्याची जबाबदारी शासनाने राज्य परिवहन मंडळाकडे सोपविली. मानव विकास योजनेअंतर्गत शालेय वेळापत्रकानुसार सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेस यातील प्रवासी आसने हे खास विद्यार्थिनींसाठी आरक्षित असतानाही अनेक प्रवासीच त्या असाणावर बसतात. यानंतर मात्र चढणाऱ्या विद्यार्थिनींना जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी असलेले वाहक हे आपले कर्तव्य झटकून प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत नाही. त्यामुळे त्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. यामुळे शाळकरी विद्यार्थिनींना एस.टी.तील गर्दी पाहून काही तरुणांकडून नको ते टॉटींग केली जाते. तर गर्दीत बिचाऱ्या सावित्रीच्या लेकींना नको त्याही परिस्थितीत उतरणाऱ्यांचे धक्के खावे लागते. सदर प्रकार गंभीर असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरुन अनुचित प्रकार घडणार नाही. याकडे एसटी महामंडळाने लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)
हक्काच्या एसटीतही ‘सावित्रीं’चा उभ्याने प्रवास
By admin | Updated: September 30, 2016 01:16 IST