शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांनी निर्भयपणे लिखाण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:11 IST

विधिमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन या तिन्ही स्तभांना टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाने निर्भयपणे लिखाण करावे.

ठळक मुद्देनाना पटोले : चंद्रपुरात पत्रकार दिनाचा कार्यक्रम

चंद्रपूर : विधिमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन या तिन्ही स्तभांना टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाने निर्भयपणे लिखाण करावे. पत्रकारांनी समाजाचा खरा चेहरा शासनापुढे मांडावा. पत्रकारांनी पत्रकारितेची ताकद कदापि कमी होऊ देवू नये, असे मत भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी स्थानिक मराठी पत्रकार भवनात पार पडलेल्या पत्रकार दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षपदी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य चेतन भैरम, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, परिषद प्रतिनिधी बबन बांगडे, मुरली मनोहर व्यास, अ‍ॅड. एकनाथ साळवे, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, श्रीपाद जोशी, अंबिका दवे आदी उपस्थित होते.यावेळी पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांना बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, समाजसेवक रामभाऊ वैरागडे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, सत्यनारायण तिवारी यांना सेवावृत्ती पुरस्कार, राजुराचे प्रेस फोटोग्राफर अविनाश दोरखंडे यांना स्मृती पुरस्कार इरफान शेख यांना झेप गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर पत्रकारांसाठी आयोजित विविध स्पर्धेचे वितरण करण्यात आले. यावेळी अनिल पाटील यांना शोधवार्ता पुरस्कार, ग.म. शेख यांना पर्यावरण पुरस्कार, पिंपळगाव ब्रह्मपुरीचे रवि शेंडे यांना शैक्षणिक संस्था विकास वार्ता पुरस्कार देवून पुरस्कृत करण्यात आले.संचालन मोरेश्वर राखुंडे प्रास्ताविक विनोदसिंह ठाकूर तर उपस्थिताचे आभार सुनील तिवारी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.