सुधीर मुनगंटीवार : राजुरा येथे कार्यक्रमराजुरा : पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपून, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करावे, समाजातील शोषित पीडित आणि समाजातील दृष्ट प्रकृतीचा खातमा करण्यासाठी निर्भिडपणे पत्रकारानी लेखणीचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.राजुरा तालुका पत्रकार संघ इमारत भुमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून राजुराचे आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. प्रभाकर मामूलकर, अॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, जि. प. सदस्य देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी खिरटकर, उपविभागीय बांधकाम अधिकारी टांगले, मुख्याधिकारी शिरिष बन्नोरे, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकडे, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी.यू. बोर्डेवार, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उमाकांत धोटे, मसूद अहेमद, मोहन शर्मा, विनायक देशमुख, प्रविण देशकर, गणेश बेले, बाबा बेग, चरणदास नगराळे, एस. के. शेलोटे, मिलींद देशकर, कृष्ण कुमार, नितीन मुसळे, वामन पुरटकर, अंजय्या येलकापल्ली, राजुरा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सदानंद लांडे, अॅड. अरुण धोटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार, आ. अॅड. संजय धोटे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संचालन आनंद चलाख यांनी केला. प्रास्ताविक अनिल बाळसराफ यांनी केला. आभार सुरेश साळवे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
पत्रकारांनी सामाजिक उन्नतीसाठी कार्य करावे
By admin | Updated: August 20, 2016 00:51 IST