शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारिता समाजाचा आरसा आहे

By admin | Updated: January 10, 2017 00:49 IST

पत्रकारितेच्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची रेलचेल आहे. तरीही मुद्रीत साहित्यातील वर्तमान पत्राचे महत्त्व कमी झाले नाही.

हरीश शर्मा : बल्लारपुरात मान्यवरांचा सत्कार समारंभबल्लारपूर : पत्रकारितेच्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची रेलचेल आहे. तरीही मुद्रीत साहित्यातील वर्तमान पत्राचे महत्त्व कमी झाले नाही. वाचक वर्ग वर्तमानपत्रातील बातम्यावर विश्वास ठेवून आहे. पत्रकारांनी विकासात्मक व समाजाभिमुख लेखन करणे अपेक्षित आहे. पत्रकारितेचे क्षेत्र म्हणजे समाजाचा आरसा आहे, असे प्रतिपादन बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा यांनी शुक्रवारी येथे केले.बल्लारपूर तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्यसाधून स्थानिक श्री संत तुकाराम महाराज सभागृहात चित्र रंगभरण स्पर्धा, सामाजिक, क्रीडा, कला, शिक्षण, राजकीय व शासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शर्मा बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र आर्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नितीन जुनोनकर, प्रसिद्ध लेखक आशिष देव, सत्कारमुर्ती माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, कवी मनोज बोबडे, सामाजिक कार्यकर्ता आलोक साळवे यांंची उपस्थिती होती.यावेळी आशिष देव म्हणाले, आज घडीला पत्रकारितेच्या क्षेत्रात बदल घडत आहेत. नकारात्मक व सकारात्मक बातम्यात टष्ट्वंवटष्ट्वंव सुरू असल्याचे दिसून येते. एकच बातमी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळी प्रकाशित केली जाते. तरीही वर्तमानपत्र इतर माध्यमापेक्षा श्रेष्ठ असून विश्वहार्यता जोपासून असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अनेकश्वर मेश्राम यांनी केले. संचालन प्रा. विजय सोरते यांनी तर आभार पद्माकर पांढरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय रासेकर, प्रशांत वैरागडे, रमेश निषाद, सुजय वाघमारे, विकास राजूरकर, प्रशांत रणदिवे, प्रशांत विघ्नेश्वर, अ‍ॅड. संजय बोराडे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)यांना करण्यात आले सम्मानितमहाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे, शासकीय क्षेत्रातील मुख्याधिकारी विपीन मुद्धा, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, साहित्य क्षेत्रातील मनोज बोबडे, सामाजिक कार्यासाठी आलोक साळवे यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे आस्था गार्जलावार, चंदनकुमार शाह या विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुखमीत कौर, प्राचार्य भावना वेणू गोपाल, प्राचार्य पी. संतोषकुमार, कविता कंडे, रजिया खान, स्वाती बाबुळकर, सुरेखा चंदेल, डी.एल. जांभुळे, उज्वला येरमे, शितल वाघमारे, फरदाना कुरेशी, दीपाली चिवंडे, शैलेस येरणे, शिल्पा टिपले, रजनी वाळके यांचाही सत्कार करण्यात आला.