शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिवतीचे तहसील कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: August 1, 2015 01:02 IST

गुरुवारी जिवती येथील आठवडी बाजार असते. तहसीलची कामे आणि बाजारासाठी विविध गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात येतात.

नागरिकांना नाहक त्रास : तहसीलदारांसह कर्मचारी येतात उशिराशंकर चव्हाण जिवतीयेथील महसुल विभागाचे कार्यालय म्हणजे ‘कुणीही या, अन् कधीही निघून जा’ अशीच स्थिती येथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सेवा देण्यासाठी मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत. मात्र मुख्यालयी राहणे तर सोडाच, पण वेळेवरही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान उजेडात आला. सेतूतील हेराफेरी नागरिकांच्या मुळावरकार्यालयात असलेल्या सेतूचा हेतूच नागरिकांना कळेनासे झाले आहे. कुठलेही काम असो दाम दिल्याशिवाय काम होत नाही. त्यामुळे पहाडावरील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जनतेची कामे सुलभ व लवकर व्हावी, यासाठी तहसील कार्यालयात कंत्राटदार पद्धतीने सेतूची निर्मिती केली. मात्र या ठिकाणी काम करणाऱ्यांनी आपला व्यवसायच बनविला आहे. पैसे दिल्यावर काम लवकर होतात आणि एखाद्याने नाही दिले तर त्याला विविध कारणे सांगून हेलपाटे मारायला लावतात. अनेक वेळा या संदर्भात तक्रारी दिल्यात, मात्र कार्यवाही कुणावरही झाल्याचे दिसत नाही.कार्यालयात शुकशुकाटप्रस्तुत प्रतिनिधीने कार्यालयात फेरफटका मारला असता ११.३० वाजेपर्यंत तहसीलदार व नायब तहसीलदार कार्यालयात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या खुर्च्या रिकाम्या तर होत्याच पण इतर कर्मचारीही साहेब नसल्याचे कारण सांगून बाहेर गप्पा ठोकत होते. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.

गुरुवारी जिवती येथील आठवडी बाजार असते. तहसीलची कामे आणि बाजारासाठी विविध गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. आपली कामे लवकर व्हावी यासाठी नागरिकांनी कार्यालयाच्या वेळेतच मोठी गर्दी केली होती. मात्र ११.३० वाजले तरी अधिकाऱ्यांचा पत्ता नाही. दरवाज्याजवळ ताटकळत उभे असलेली नागरिक वैतागली होती. साहेब कधी येणार याकडे सर्वांचे चातकासारखे डोळे लागले होते. कार्यालयाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. इतर कर्मचारीही साहेब नसल्याचे कारण सांगून गप्पा ठोकण्यात मग्न होती. हा प्रकार सर्वसामान्य नागरिकांसोबत नेहमीच घडत असतो. कधी तहसीलदारामुळे कामे अडकतात तर कधी पटवारी व लिपीकामुळे कामे रेंगाळली जातात. याचा त्रास होतो फक्त सर्वसामान्य नागरिकांना. जनतेची कामे वेळेवर व तातडीने व्हावी यासाठी प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र कुणीही मुख्यालयी राहत नाही. कर्मचारी राजुरा, गडचांदूर, चंद्रपूर येथून ये-जा करतात. त्यामुळे वेळेवर कुणीच येत नाही. कार्यालयात दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण थांबावे, यासाठी शासनाने ‘थंब’ मशिन बसविली. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे पहाडावरील नागरिकांची कामे रेंगाळली असून एकाच कामासाठी वारंवार चकरा मारावे लागत आहे. संबंधित विभाग मात्र याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.