शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बॉटनिकल गार्डनमध्ये साकारणार वनवृक्ष प्रजातींची जीन बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:11 IST

येथील बॉटनिकल गार्डनमध्ये विदर्भातील वनवृक्ष प्रजातीची जीन बँक निर्माण केली जाणार असून या संकल्पनेप्रमाणेच गार्डनची उभारणी करताना अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जावेत, ....

ठळक मुद्देवनमंत्र्यांच्या सूचना : नावीन्यपूर्ण संकल्पना राबवा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील बॉटनिकल गार्डनमध्ये विदर्भातील वनवृक्ष प्रजातीची जीन बँक निर्माण केली जाणार असून या संकल्पनेप्रमाणेच गार्डनची उभारणी करताना अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जावेत, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनसचिव विकास खारगे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वनवृक्ष प्रजातीच्या या जीन बँकेचा उपयोग विद्यार्थी आणि संशोधकांना होणार असून त्यांना संशोधनासाठी आवश्यक असणाºया सर्व सुविधा तिथे उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे सांगत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लखनौची नॅशनल बॉटनिकल रिसर्च लॅब्रोटरी ही देशातील बॉटनी या विषयात काम करणारी प्रमुख लॅब्रोटरी असून ती या जीन बँकेबरोबर चंद्रपूर बॉटनिकल गार्डनमध्ये कॅकटस गार्डन, बोनसाय गार्डन, डिहायड्रेटेड फ्लॉवर्स गार्डन या उपक्रमावर काम करत आहे.चंद्रपूर बॉटनिकल गार्डनचे काम करताना इतर उपक्रमही अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने निवडून गार्डनेचे काम वेगाने पुढे न्यावे. या बॉटनिकल गार्डनमध्ये वन विभागाने औषधी वनस्पतींचे स्वतंत्र दालन निर्माण करावे तसेच या गार्डनचे काम करताना देशातील इतर बॉटनिकल गार्डन पहावेत, तिथल्या चांगल्या कल्पना येथे राबवाव्यात. केंद्र शासनाने अशा काही गार्डन देशात निर्माण केल्या आहेत का, याचा अभ्यास करावा, केले असल्यास यासाठी केंद्र शासनाकडून काही निधी मिळतो का, याचाही शोध घ्यावा. निधी मिळत असल्यास त्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा, असेही ते म्हणाले.हे गार्डन पाहताना तिथे येणारा पर्यटक तीन ते चार तास तिथे रमला पाहिजे, त्याला आपण एक नवी सृष्टी पाहात आहोत, याचा आनंद मिळाला पाहिजे, अशा दृष्टीने गार्डनमधील कामे झाली पाहिजेत, असे ते म्हणाले. वृक्ष प्रजातींप्रमाणेच विदर्भातील वन्यजीवांची माहिती येथे दिली जावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने गार्डनच्या कामांचा दर्जा उत्तम राहील, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. बॉटनिकल गार्डनचे एक मोबाईल अ‍ॅप तयार करावे, त्यामाध्यमातून लोकांची-तज्ज्ज्ञाची मते आणि अपेक्षा मागवाव्यात, असेही ते यावेळी बैठकीत म्हणाले.७० प्रजातीच्या वृक्षांची लागवडवन विभागातर्फे या गार्डनमध्ये ६५०० खड्डे खोदण्यात आले असून त्यात ७० प्रजातींच्या रोपांची लागवड करण्याचे काम करण्यात येत आहे. १५०० बांबू रोपांची लागवड येथे झाली असून उर्वरित बांबू रोपवनाचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असलेल्या विविध कामांची सध्याची स्थिती, निविदा प्रक्रिया आणि कामाची गती यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.-