राजुरा : जेसीआय सास्ती कोल टाऊनतर्फे सामाजिक कर्तव्य म्हणून उद्या १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मतदानाकरिता जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच प्रत्येकानी संविधानाने दिलेल्या हक्काचा वापर करावा, आपल्या अमूल्य मताचा वापर करुन प्रत्येकांनी मतदान करावे, याकरिता मतदाता जागरुकता अभियान रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. पंचायत समिती, नाका नं. ३, भारत चौक, गांधी चौक, नेहरु चौक, डॉ. आंबेडकर चौकातून रॅली फिरुन शेवटी तहसील कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये मतदारांना जागृत करण्याकरिता लहान पोस्टर, बॅनर, संदल, कार्टुन इत्यादीचा वापर करण्यात आला होता. रॅलीमध्ये कल्याणी नर्सिंग संस्था, शिवाजी हायस्कूल, जिजामाता कन्या विद्यालय राजुरा शाळेतील मुलीचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्राचार्य, शिक्षक यांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. रॅली निघण्यापूर्वी जेसी क्रिडचे वाटप करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी गोयल व तहसीलदार फुसाटे यांचे हस्ते करण्यात आले. रॅलीत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनीही सहभाग नोंदवून गोयल यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात विलास शेंडे यांनीआभार मानले.(शहर प्रतिनिधी)
मतदाता जागरुकता अभियान रॅलीतून जेसीआयतर्फे जनजागृती
By admin | Updated: October 14, 2014 23:16 IST