शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

चिमूर तालुक्यातील शिवारात होणार ‘जलक्रांती’

By admin | Updated: April 19, 2017 00:47 IST

ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतीतील पाण्याची पातळी वाढून जलसाठा वाढावा यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली.

जलयुक्त शिवाराची ७४५ कामे पूर्ण : आढावा बैठकचिमूर : ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतीतील पाण्याची पातळी वाढून जलसाठा वाढावा यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या जलयुक्त शिवारातील मसगी मामा तलाव इत्यादी कामातून चिमूर तालुक्यातील शिवारात जलक्रांती होणार आहे.चिमूर तालुक्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे तालुक्यात असलेल्या मसगी नाला खोलीकरण, बंधारे, मामा तलाव दुरुस्ती, पंचायत समितीतंर्गत शेततळे या कामाचा जलयुक्त शिवारात समावेश आहे. राज्य शासनाने जलयुक्त शिवारावर करण्यात येणारा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत जलयुक्त शिवाराच्या कामाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवले जात आहे.चिमूर विधानसभा क्षेत्रातील समाविष्ठ चिमूर, नागभीड व ब्रह्मपुरी तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामाची आढावा बैठक नुकतीच चिमूर येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या आढावा सभेत चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे, चिमूरचे तहसीलदार संतोष महले, नागभीडचे तहसीलदार समीर माने, संवर्ग विकास अधिकारी एम.बी. डोंगरे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.बी. राजवाडे, कृषी अधिकारी एम.पी. पवार, यांच्यासह इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.चिमूर तालुक्यात सन २०१५-१६ या सत्रात २२ गावाचा समावेश करण्यात आला होता. त्यास १४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. सन २०१६-१७ या वर्षात २७ गावांसाठी सहा कोटी ८८ लाख तर २०१७-१८ या वर्षामध्ये २४ गावांचा समावेश करण्यात आला. या कामासाठी आतापर्यंत २१ कोटी २६ लाख रुपयांचा निधी खर्च करून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये ९४५ कामे प्रस्तावित होती .आतापर्यंत ७८५ कामे पूर्ण करण्यात आली. तर ८१९ कामे प्रगती पथावर आहेत. या कामामध्ये कृषी विभागातर्फे ७२७ कामे पंचायत समिती मनरेगा १६ कामे, जि.प. सिंचाई विभागातर्फे १४ कामे जलसंधारण लघू सिंचन २३ कामे व वनविभागातील २६६ कामे आहेत.आढावा सभेतून जलयुक्त शिवाराच्या कामाला गती देवून काम योग्य पद्धतीने वेळेवर पूर्ण करण्याच्या सुचना देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या सुचना आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. चिमूर तालुक्यात होणाऱ्या या जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे गावागावातील शिवारात जलक्रांती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)