शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरात अंगणवाडी सेविकांचा जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:20 IST

मागील महिन्यापासून मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य शासनाने संपाची दखल घेत अंगणवाडी सेविकांनी मानधात तुटपुंजी वाढ करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देशासनाने आता तरी दखल घ्यावी : अंगणवाडी केंद्र महिनाभरापासून बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मागील महिन्यापासून मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य शासनाने संपाची दखल घेत अंगणवाडी सेविकांनी मानधात तुटपुंजी वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यातील अंगणवाडी सेविकांनी ही वाढ न स्वीकारता आदोलन आणखी तीव्र केले आहे. चिमूर, वरोरा, भद्रावती, ब्रम्हपूरी, नागभिड, सिंदेवाही सह सर्वच तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी गुरूवारी दुपारी चिमूर तहसील कार्यालयावर धडक देत जेलभरो आंदोलन केले. यात शेकडो अंगणवाडी सेविकांना अटक व सुटका करण्यात आली.सहा वर्षाच्या बाळापासून तर गरोदर मातांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करीत आहेत. समाजाला व देशाला सुदृढ करण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडून करवून घेण्यात येते. मात्र त्याबदल्यात तुटपुंजे मानधन देण्यात येते. अल्पशा मानधनामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना आर्थीक टंचाईचा सामना करावा लागत आहे. मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी अनेक वर्षापासून निवेदने, धरणे, आंदोलने करीत आहेत. मात्र शासनाने दखल घेतलेली नाही.राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यभरातील अंगणवाडी केंद्र बंद अवस्थेत असल्यामूळे ग्रामीण भागातील गरोदर माता बालकांना सकस आहरापासून वंचित राहावे लागत आहे. मात्र प्रशासनाला मागण्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून जेलभरो आंदोलन करीत शासनाला जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात चिमुर तालुक्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता. राज्याध्यक्ष ईकलाखभाई कुरेशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.