शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नांदा नगरीत जय गुरुदेवचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2017 00:37 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी व वैराग्यमूर्ती कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या ६० व्या स्मृतीदिन यानिमित्त नांदा येथे दोन दिवसीय भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भजने ठरली आकर्षणाचे केंद्र : कीर्तनकारांनी केले जनप्रबोधनआवाळपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी व वैराग्यमूर्ती कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या ६० व्या स्मृतीदिन यानिमित्त नांदा येथे दोन दिवसीय भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या दिवशी सकाळी ग्रामस्वच्छता अभियानाने सुरुवात झाली. प्रार्थना स्थळावर काही ज्येष्ठ मंडळाचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर तळोधी येथील नगाजी भजन मंडळ तळोधी या चिमूरड्यांच्या भजनाने अख्या गावाला मंत्रमुग्ध केले.‘क्या किया, क्या किया, क्या किया रेतुने जीवन गमाई दिया क्या किया रेजिसे पाना था उसको तो खो दिया’या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जीवनात मानवाने काय केले आहे. आणि आपल्या स्वार्थासाठी माणुसकीसुद्धा सोडली जात आहे. या गाण्याने चिमूकल्या बालिकेने अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आणले. तर इतर बाहेर गावून आलेल्या भजन मंडळीने भजनाच्या मैफिलीत भर टाकली. भजनाचा मनमुराद आनंद लुटण्याची ग्रामवासियांना संधी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणारे, गुरुकुंज मोजरी येथील पंकज पाल महाराज यांचा सप्तखंजेरी वादनाचे. त्यांनी आपल्या वाणीने तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांचा मनोरंजनात्मक पोवाडा वाचून लोकांच्या मनात संताचे संदेश पोहोचविले.सकाळी पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. यात दहा गावातील भजन मंडळींनी सहभाग दर्शविला होता. याप्रसंगी वेगवेगळ्या संतांची आणि वेगवेगळ्या पोषाखांनी पालखी सोहळ्यात अधिकचा रंग भरला. त्यात प्रत्येक भजनधारी आणि लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत श्री ‘गुरुदेव की जय’ ही घोषणा देत अखे गाव गजराने निनादले होते. विरुर स्टे. येथील भजन मंडळ नागरिकांचे आकर्षण ठरले होते.या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गुरुकुंज आश्रम मोजरी येथील रविदादा मानव यांनी सामुदायिक प्रार्थनेवर नागरिकांना संबोधित केले. ‘है प्रार्थना गुरुदेव सेयह स्वर्ग सम संसार हो ’अशा प्रकारे त्यांनी ग्रमावासीयांना प्रार्थनेचे महत्त्व पटवून दिले.सामुदायिक प्रार्थना राष्ट्रीयत्वाचे वारे निर्माण करीत जग नंदनवन बनतील. ती समाजाला सामुदायीक वृत्ती निर्माण करणार. यामुळे विश्वबंधूत्त्वाचे प्रेम समाजात पेरले जातील. राष्ट्रात क्रांती होत आहे. पण ती फार मंदगतीने होत आहे. ही मालिनता प्रार्थनेने दूर होईल. शुद्धता प्रार्थनेने निर्माण होईल. ही प्रार्थना घराघरात दैवी शक्ती निर्माण करणार, हे निश्चित. तुमची मुले सुखसमाधानाने जगू लागतील. एवढेच नाही तर काही संत म्हणून सुद्धा उदयास येतील.सदर कार्यक्रमाप्रसंगी सरकारी खात्यात लागणाऱ्या गावातील तरुण मंडळींचा सत्कारसुद्धा करण्यात आला. साक्षी अतकारे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम यावेळी झाला. डाखरे महाराज, सुरेश चौधरी महाराज, जंगलू गोवारदिपे, उपरे महाराज यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन भास्कर लोहबळे यांनी केले तर आभार मारोती जमदाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समस्त गुरुदेवभक्तांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)