शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कापसामुळे शेतकऱ्यांना सुटताहे खाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:22 IST

कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे.

ठळक मुद्देबोंडअळी कारणीभूत : शेतकऱ्यांची रुग्णालयात धाव

आॅनलाईन लोकमतगोवरी : कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे. बोंडअळीने कापूस पुर्णत: खराब झाला असून कापसाला लहान-लहान किड्यांनी वेढले आहे. त्यामुळे कापसाला हात लावल्यास मोठ्या प्रमाणात खाज सुटत असून त्वचेवर लालसर ठिपके पडत आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागली.यावर्षी बोंडअळीने कापसाला खाऊन टाकल्यानंतर कापसावर किड्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. यावर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कापूस घरीच असल्याने आता कापसाला हात लावल्यास खाज सुटत आहे. याचा विपरित परिणाम शेतकºयांच्या शरिरावर व्हायला लागला आहे. कापसामुळे हातापायांवर, पाठीवर, पोटावर मोठ्या प्रमाणात खाज येत आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतला आहे. गोवरी, पोवनी, चिंचोली व बहुतांश परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी हीच परिस्थिती उद्भवली असून शेतकºयांना कापसाच्या खाजेने बेजार केले आहे.ज्यांच्या घरी कापूस, त्यांनाच होतेय अ‍ॅलर्जीकापूस ज्या शेतकऱ्यांच्या घरी भरून आहे, त्याच शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सदस्यांना अंगावर खाज येण्याचा त्रास होत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने काही शेतकºयांच्या घरी भेट दिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. अनेक शेतकऱ्यांनी राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू केला आहे.भीतीपोटी कवडीमोल भावात विक्रीकापसामुळे मोठ्या प्रमाणात खाज सुटत असल्याने शेतकऱ्यांनी त्वचेच्या आजाराच्या भीतीपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करायला सुरूवात केली आहे. कोणत्याही आजाराला बळी पडण्यापेक्षा कापूस विकलेला बरा, अशी प्रतिक्रिया शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कापसाला दर नसल्याने कापूस घरीच भरून ठेवला होता. मात्र कापसाला मोठ्या प्रमाणात खाज असल्याने शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. नाईलाजाने कापूस विकावा लागला.- सुधाकर जुनघरी,शेतकरी, गोवरी.